आज, उद्या तुरळक सरी

१९ जूनपर्यंत राज्यात २७.८५ इंच पावसाची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात पुढील दोन दिवस मध्यम ते तुरळक पावसाची शक्यता आहे. २२ आणि २३ जून रोजी पावसाची शक्यता नाही, अशी माहिती गोवा हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे.

राज्यात १९ जूनपर्यंत २७.८५ इंच पावसाची नोंद

शुक्रवारी रात्री ते शनिवारी मिळून एकूण ६२.३ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. वाळपई, साखळी आणि पेडण्यासह अन्य काही ठिकाणी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. राज्यात १९ जूनपर्यंत २७.८५ इंच पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीपेक्षा ३८ इंच अधिक आहे. समुद्रात ६० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत.

राज्यातील कमाल तापमान २९ अंशांपर्यंत कायम असेल

तापमानात पुन्हा घट झाली आहे. शुक्रवारी ३१ अंशांपर्यंत कमाल तापमान होतं. वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, शनिवारी पणजीत कमाल तापमान २८ अंश, तर किमान तापमान २३.५ अंश, तर मुरगावात कमाल ३०, तर किमान २२.८ अंश सेल्सिअस नोंद झालं. राज्यातील कमाल तापमान २९ अंशांपर्यंत कायम असेल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!