मडगाव रेल्वे स्थानकावर तंबाखूजन्य पदार्थ जप्त; संशयितास अटक

कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई; २३ लाख रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: कोकण रेल्वेतून वाहतूक केला जाणारा सुमारे २३ लाख रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ कोकण रेल्वे पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी एका संशयिताला गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार अटक करण्यात आली.                        

मडगाव रेल्वे स्थानकावर कारवाई

कोकण रेल्वे पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेतून वाहतूक केला जाणारा गुटखा तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आल्यावर मडगाव रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली.

संशयितास अटक

या प्रकरणी संशयित हरकेश धनीराम भैरवा (३८, रा. वाडे वास्को, मूळ करौली – राजस्थान) याला कोकण रेल्वे पोलिसांनी अटक केली. संशयितावर गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी कोकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक हिरू कवळेकर पुढील तपास करत आहेत.                      

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!