टीकेनंतर ठाकरे सरकारला उपरती ; वादळग्रस्तांसाठी आता तब्बल २५० कोटींचं पॅकेज !

एनडीआरएफच्या निकषांपेक्षा १८० कोटी अधिकचे राज्य सरकारच्या तिजोरीतून कोकणवासीयांना देण्यात येणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : वादळाच्या पाहणी दौऱ्यानंतर जोरदार टीका झाल्यावर आता चक्रीवादळातल्या नुकसानग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारनं मोठं पॅकेज देण्याचा निर्णय घेतलाय. याबद्दलची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या चक्रीवादळग्रस्तांसाठी २५० कोटी रुपयांचं पॅकेज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबद्दलचा शासन निर्णयही उद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्य सरकार देणार अधिकची रक्कम !

निसर्ग चक्रीवादळावेळी काढण्यात आलेला शासन निर्णय याही वादळाच्या नुकसान भरपाईसाठी लागू करण्यात आला आहे. तसंच एनडीआरएफच्या निकषांपेक्षा १८० कोटी अधिकचे राज्य सरकारच्या तिजोरीतून कोकणवासीयांना देण्यात येणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं. यासंदर्भात काल बैठक घेण्यात आली आणि उद्याच्या कॅबिनेट बैठकीनंतर यासंदर्भातला शासन निर्णय काढण्याचं आम्ही ठरवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

विरोधकांचा पाठपुरावा महत्वाचा !

दरम्यान, या नुकसान भरपाईबद्दल विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका केली जात होती. मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली…किती वेळ? फक्त तीन तास…तीन तासाचा हा दौरा केला. दोन दिवसांत भरपाई देणार म्हणाले..दिली का? का नाही दिली अजून…भरपाईची ठोस रक्कम अजूनही का जाहीर केलेली नाही? असे अनेक सवाल नारायण राणेंनी या सरकारवर उपस्थित केले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!