कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे व खते होणार पोहोच !

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाचा उपक्रम ; गेल्या वर्षी २३ क्विंटल बियाणे व ६७ टन खते पोहोचली थेट बांधावर

Goan Varta Live | प्रतिनिधी

सावंतवाडी : गेल्या वर्षापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यात गर्दीच्या ठिकाणी एकमेकांशी संपर्क आल्यास किंवा प्रवासात या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे, हे लक्षात आल्यानंतर गेल्याव वर्षापासून शेतकऱ्यांना थेट बांधावर किंवा त्यांच्या दारापर्यंत खते व बियाणे पोहोच करण्याचा उपक्रम महाराष्ट्र शासन कृषी विभाग राबवत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी २३ क्विंटल बियाणे व ६७ टन खते शेतकऱ्यांना पोहोच केली गेली होती.

या उपक्रमाचा भाग म्हणून तळवडे येथे गत वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा बांधावर बियाणे व खते पोहोच करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे. फक्त वाडीनुसार किंवा शेतकरी गट किंवा बचत गट यांनी एकत्र येवून आपली मागणी नोंदवण्याचे आवाहन कृषी विभाग करत आहे. तरी सदर उपक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.


या उपक्रमामुळे दुकानांवरील गर्दी कमी होते, तसेच शेतकऱ्यांना जाणे येणे वाहतूक खर्च वाचतो, मागणी एकत्र करताना उपलब्ध बियाणे व खते यांची माहिती व दर कळविले जातात. मागणी जो पुरवठा करेल अशा कृषी सेवा केंद्र , विकास सोसायटी किंवा संघास कळविले जाते व सदर पुरवठादार एकत्र पुरवठा करतो. पुरवठा होण्याच्या अगोदर मागणीनुसार संबंधित खते व बियाण्यांची रक्कम गोळा करतात. पुरवठा झाल्यावर संबंधित विक्रेत्यास रक्कम अदा केली जाते, रास्त दरात खते व बियाणे यांचा पुरवठा होतो. शेतकरी बांधवांनी गर्दी टाळावी, जेणेकरून कोरोनाला हरवण्यासाठी मदत होईल,असे आवाहन तळवडेचे कृषि सहाय्यक यशवंत गव्हाणे यांनी केले आहे.या वर्षी सुद्धा गेल्या सालाप्रमाणेच नियोजन व कार्यवाही सुरु आहे. गेल्या वर्षी २३ क्विंटल बियाणे व ६७ टन खते शेतकऱ्यांना पोहोच केली गेली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!