तिरुमला सोसायटीचे लॉकर फोडून चोरी

सुमारे 7 लाखांची रोकड लंपास

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: येथील तिरमल तिरुपती मल्टिस्टेट को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यालयातील लॉकर अज्ञाताना फोडून रोख रक्कम चोरी केल्याचा गुन्हा पणजी पोलिसांनी दाखल केला. सुमारे 7 लाखांची रोकड चोरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिप्तेश सावंत यांनी दाखल केली तक्रार

या प्रकरणी सोसायटीचे क्षेत्रीय व्यवस्थापक दिप्तेश सावंत यांनी पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, सोसायटीच्या कॅशियरने 17 रोजी सर्व रक्कम लॉकरमध्ये ठेवली होती. त्यावेळी व्यवस्थापकांनी त्या रकमेची खात्री केली होती. त्यानंतर संध्याकाळी 6.44 वाजता सोसायटी बंद करून घरी गेल्याचं व्यवस्थापकाने म्हटलं आहे.

18 रोजी रक्कम चोरीला गेल्याचं समजलं

18 रोजी सकाळी सोसायटीचे कार्यालय उघडलं असता, लॉकर फोडून रोख रक्कम तसंच इतर दस्तावेज चोरल्याचं समोर आलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज पाहिलं असता, चोरट्याने दुसऱ्या कार्यालयातून प्रवेश केल्याचं समोर आलं. या कार्यालयाची चावी सोसायटीच्या उद्घाटनाच्या दिवशी 10 ऑगस्ट रोजी हरवली होती.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

या तक्रारीची दखल घेऊन पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब यांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!