टिंटेड काचा हटवायला लावणारच; जुझे फिलीप डिसोझांच्या घोषणेचं स्वागत

वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्होः साल्ढाणावर नो कमेंट

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः दर 3 महिन्यानंतर घेण्यात येणारी भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी पणजीत पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व मंत्र्यांनी उपस्थिती लावली. या बैठकीला वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो उपस्थित होते.

आमदाराच्या गाडीच्या काळ्या काचांवर काय कार्यवाही करणार का? असा प्रश्न केला असता, संबंधित आमदाराला गाडीच्या काळ्या काचा हटवायला लावणार असल्याचं आश्वासन गुदिन्होंनी दिलंय.

तसंच जुफे फिलीप डिसोझा यांनी दाबोळी मतदारसंघातून मॉविन गुदिन्हो यांच्याविरुद्ध उभं राहणार असल्याची घोषणा केलीये. याविषयी मॉविन गुदिन्होंची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, की जुझे फिलीप डिसोझा यांच्या घोषणेचं मी स्वागत करतो. राजकारणात प्रतिस्पर्धी हा असलाच पाहिजे. बिनविरोध निवडून येण्याची माझी इच्छाही नाही, असं म्हणालेत.  

कुठ्ठाळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार का, या प्रश्नावर बोलताना, माझ्या दाबोळी मतदारसंघाची मी फसवणूक करू शकत नाही. तेथील लोकांना सोडू शकत नाही. कुठ्ठाळीत माझा उमेदवार मी उभा करेन आणि त्याला जिंकून आणेन, असं गुदिन्हो म्हणालेत.

तर एलिन साल्ढाणांच्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगणं पसंत केलंय. अजून काय म्हणालेत गुदिन्हो, जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!