तिलारी धरण भरले 86 टक्के ; नदी इशारा पातळीच्या जवळपास

गेल्या २४ तासात तब्बल १६९ मिमी इतक्या पावसाची नोंद

संदिप देसाई | प्रतिनिधी

दोडामार्ग : गेले दोन दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाची पाणी पातळी कमालीची वाढली असून धरण ८६ टक्के इतके भरले आहे. तर तिलारी नदीची पाणी पातळी सुद्धा इशारा पातळीच्या जवळपास पोहचली आहे. दरम्यान सकाळपासून पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या २४ तासात तिलारी तब्बल १६९ मिमी इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

पाणीसाठा, पाऊस व नदी पाण्याची पातळी अशी…
पाणी पातळी 109.6 मी.
सांडवा माथा पातळी 106.70 मी.
पूर्ण जलसंचय पातळी 113.20 मी.
उपयुक्त पाणीसाठा 383.401 दलघमी
टक्केवारी 85.70 %
सांडवा विसर्ग 324.930 घ.मी./से.
विद्दुतगृह विसर्ग 8.00 घ.मी./से.
सेवाद्वार विसर्ग 1.50 घ.मी./से.
एकुण विसर्ग 334.43 घ.मी./से.
डावा कालवा विसर्ग 6.50 घ.मी./ से.
येळपई नाला विसर्ग 3.00 घ.मी./से.
नदी पातळी 40.40 मी.
ईशारा पातळी 41.60 मी.
धोका पातळी 43.60 मी.
आजचा पाऊस 169.80 मी.मी.
एकुण पाऊस 1791.80 मी.मी.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!