श्रीमती कमलाबाई हेदे हायस्कूल येथे टिळक पुण्यतिथी उत्साहात

Goan Varta Live | प्रतिनिधी
शिरोडाः येथील श्रीमती कमलाबाई हेदे हायस्कूल येथे 1 ऑगस्ट रोजी टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त हायस्कूलात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोविड महामारी असल्याने कोविड नियमावलीचं पूर्ण पालन करताना विद्यार्थ्यांसाठी खास ऑनलाईन माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हेही वाचाः शिक्षकांनी आपलं ज्ञान अद्ययावत करणं गरजेचं
मुख्याध्यपकांकडून टिळकांना मानवंदना
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हायस्कूलचे मुख्याध्यापक विकास पाटील यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर दिपप्रज्वलन करून टिळकांना मानवंदना दिली. यात हायस्कूलच्या इतर शिक्षकांनादेखील सहभाग दर्शवला.
हेही वाचाः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडताय?
ऑनलाईनच्या माध्यमाधून कार्यक्रम
गुगल मिटच्या माध्यमातून हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. यावेळी गुगल मिटच्या माध्यमातून मुलांनी भाषणे, स्वगत, कविता सादर केल्या. कार्यक्रम जरी ऑनलाईन माध्यमातून साजरा केला असला, तर विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घेतला. या दिवसाची संधी साधून मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांचं विशेष कौतुक केलं.
हेही वाचाः मांद्रे मनोरंजन सिटीला आमचा विरोधच !
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.