डिचोलीत ‘या’ पंचायतीत ‘या’ दिवशी होणार ‘टिका उत्सव’

शनिवारी पंचायत पातळीवर लसीकरणाला सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: कोविड प्रतिबंधक लसीची मोहीम देशभरात सुरू आहे. राज्यातही हा ‘टिका उत्सव’ जोमाने सुरू करण्यात आला. डिचोली तालुक्यामध्ये लस महोत्सवाला शनिवारी पंचायत पातळीवर सुरुवात करण्यात आलीये. डिचोली तालुक्यातील पंचायतींमध्ये ‘टिका उत्सवा’ला सुरुवात झालीये. त्याला चांगला प्रकारचा प्रतिसादही लाभलाय. शनिवारी सभापती राजेश पाटणेकर तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी डिचोलीत भेट देऊन नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रोत्साहित केलं.

डिचोलीतील लसीकरण कार्यक्रम

१४ एप्रिलः मुळगाव, सरकारी प्राथमिक शाळा शिरोडकरवाडा
१५ एप्रिलः अडवलपाल, सरकारी प्राथमिक शाळा गांवकरवाडा
१५ एप्रिलः उसप/भटवाडी, सरकारी प्राथमिक शाळा उसप
१७ एप्रिलः दोडामार्ग आणि खरपाल, सरकारी प्राथमिक शाळा
१५ एप्रिलः कासरपाल आणि वडावल, सरकारी प्राथमिक शाळा, कासरपाल
१८ एप्रिलः साळ, पंचायत सभागृह
१८ एप्रिलः खोलपेवाडी/ पुनर्वसन आणि कुमयामळ, शिवाजीराजे हायस्कूल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!