गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघे जखमी…

Goan Varta Live | प्रतिनिधी
केपे : सोनारभाट केपे येथे गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. या घटनेत गॅस टेक्निशियनसह दोघे जखमी झाले आहेत.
हेही वाचा:’विद्याभारती-गोवा’ शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट…
आग पेटत असल्याने झाला सिलेंडरचा स्फोट
केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनारभाट केपे येथील व्हेलन्सिया फर्नाडिस यांच्याघरातील गॅस लिक होत असल्याने त्यांनी गॅस दुरुस्ती करणाऱ्याला बोलावले होते. यावेळी जवळच आग पेटत असल्याने सिलेंडरचा स्फोट झाला.
हेही वाचा:हस्तकला महामंडळाचे ‘वरातीमागून घोडे’, वाचा सविस्तर…
तिघांना मडगाव हॉस्पिटलात केले दाखल
या स्फोटात गॅस टेक्निशियन शेख अब्दुल रेहमान (५०), व्हेलन्सिया फर्नांडिस (३२), तेरेझा मिरान्डा जखमी झाल्या असून त्यांना मडगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. केपे पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे.
हेही वाचा:Mock Drill | वाळपई कंदब बसस्थानकात पोलीस कमांडो, दहशतवादी…