इफ्फीत जागतिक गटात तीन भारतीय चित्रपट

यंदा १६ ते २४ जानेवारीत गोव्याच्या राजधानीत सिनेतारकांचे चेहरे पाहायला मिळणारेत.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः कोविडने महामारीने सगळ्या क्षेत्रांवर मोठा परिणाम केलाय. यातून चित्रपट सृष्टीही सुटलेली नाहीये. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२०च्या नोव्हेंबर होऊ शकला नाही. हा महोत्सव यंदा जानेवारीत होणारेय. यंदा १६ ते २४ जानेवारीत गोव्याच्या राजधानीत सिनेतारकांचे चेहरे पाहायला मिळणारेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ हा १९५२ साली झाला. भारतासह जागतिक पातळीवरील सिनेमांना सक्षम व्यासपीठ मिळावं, हा त्यामागील उद्देश आहे.

चित्रपटांची यादी जाहीर

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) यंदा नेहमीप्रमणे दर्जेदार चित्रपट पाहता येणारेत. यातील जागतिक गटातील (आंतरराष्ट्रीय स्पर्धा) चित्रपटांची यादी जाहीर झालीये. भारतातील ‘ब्रिज,’ ‘अ डॉग अँड हीस मॅन’ आणि ‘थायन’ या तीन चित्रपटांचा त्यात सहभाग आहे. वरील १५ चित्रपटांतील उत्तम कलाकृती सुवर्ण मयूर पटकावेल. दरम्यान, पणजीत आयोजन तयारी अंतिम टप्प्यात आलीये.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १५ चित्रपट

५१ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पणजीत १६ ते २४ जानेवारी दरम्यान होणारेय. त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे . शुभारंभी आणि समारोपाच्या चित्रपटांसह इंडियन पॅनोरमातील चित्रपटांची नावं यापूर्वीच जाहीर करण्यात आलीयेत. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गणेश विनायकन यांचा ‘थायन,’ सिद्धार्थ त्रिपाठी यांचा ‘अ डॉग अँड हीस मॅन’ आणि कृपाल कलिता दिग्दर्शित ‘विजया भारतीय चित्रपटांचा सहभाग आहे. या गटात एकूण १५ चित्रपट आहेत. त्यात द डोमेन (पोर्तुगाल), इन टू द डार्कनेस (डेन्मार्क),फेब्रुवारी (बल्गेरिया, फ्रान्स), माय बेस्ट पार्ट ( फ्रान्स), आय नेवर क्राय (पोलंड), लायट फॉर द यूथ (दक्षिण कोरिया), रेड मून टायड (स्पेन), ड्रीम (इराण), द डॉग्स डीन्ट स्लीप लास्ट नाईट (अफगाणिस्तान, इराण), द सायलन्ट फारिस्ट (तैवान), द फारगॉटन (यूक्रेन, स्वीत्झर्लंड), ब्रिज (भारत), अ डॉन अॅन्ड हीस मॅन (भारत) आणि थायन (भारत ) या चित्रपटांचा सहभाग आहे.

आंतरराष्ट्रीय गटातील चित्रपटांना आकर्षक बक्षिसं

१६ ते २४ जानेवारी दरम्यान पणजीत होणार असलेल्या ५१ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आंतरराष्ट्रीय गटातील अव्वल चित्रपटाला आकर्षक बक्षिसं देण्यात येणारेत. आंतरराष्ट्रीय गटातील अव्वल चित्रपटाला सुवर्णमयूर व रोख ४० लाख रुपयांचा पुरस्कार मिळेल. तसंच उत्कृष्ट दिग्दर्शकाला रौप्य मयूर व १५ लाख रुपये, उत्तम अभिनेता (पुरुष) रौप्य मयूर व १० लाख रुपये, उत्तम अभिनेत्री रौप्य मयूर व रोख १० लाख रुपये, खास परीक्षक पुरस्कार लाभणाऱ्या सिनेमाला सुवर्ण मयूर व रोख १५ लाख रुपयांचं पारितोषिक मिळेल. हा पुरस्कार चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मिळेल.

इफ्फी ज्युरींमध्ये भारतीय चेहरा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) ज्युरींची निवड करण्यात आलीये. त्यात पावलो केसर – अर्जेन्टिना, प्रसन्ना विथांगे – श्रीलंका, अबू बक्र श्वाकी – ऑस्ट्रिया, रुबियत होसेन – बांग्लादेश आणि प्रियदर्शन – भारत यांचा समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.