खवळलेल्या समुद्रात तीन बोटी बुडाल्या

सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही; मच्छीमारांचं लाखो रुपयांचं नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: सध्या गोव्यात मासेमारी सुरू झाली असली तरी मच्छीमारांना खवळलेल्या दर्याशी सामना करावा लागत आहे. रविवार आणि सोमवार असे सतत दोन दिवस लाटांचा तडाखा बसून तीन बोटी बुडल्याची माहिती मिळाली आहे. या तिन्ही घटनांत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी मच्छीमारांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं.

हेही वाचाः शिवोलीत आतेसासूंचा खून; भाची सुनेवर आरोप निश्चित

सोमवारी 15 खलाशी पडले पाण्यात

सोमवारी कोलवा येथे मासेमारीसाठी दर्यात गेलेली होडी लाटांच्या तडाख्यात उलटी झाल्यानं १५ खलाशी पाण्यात पडले. मात्र, त्या सर्वांना जीवरक्षकांनी सुखरुप किनाऱ्यावर आणलं. रविवारी वार्का आणि बणावली येथे अशा दोन घटना घडल्या होत्या. वार्का येथे लाटांच्या तडाख्याने होडी फुटली. त्यातील सुमारे १० लोकांना किनाऱ्यावर आणण्यात जीवरक्षकांना यश आलं.

हेही वाचाः ‘उत्पादन शुल्क’ ची कणकवलीत मोठी कारवाई

बाणावलीत मच्छीमारांच्या जाळ्यांची हानी

बाणावली येथे मच्छीमारांच्या जाळ्यांची हानी झाली. बाणावली येथील मच्छीमार पेले फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दर्या खवळलेला असल्यानं या दुर्घटना झाल्या. पण याच काळात मासे जास्त मिळत असल्यानं मच्छीमार जीव धोक्यात घालून होड्या पाण्यात सोडतात.

हा व्हिडिओ पहाः Video | Journalist day | बार्देश तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!