VIDEO: बायंगिणी कचरा प्रकल्पाला विरोध असलेल्यांनी हायकोर्टात जावं

मंत्री मायकल लोबों: राज्यात पर्यटन सुरू होत असल्याने गोंयकारांचं तातडीने लसीकरण पूर्ण करण्याची सरकारला केली विनंती

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः पर्वरीत बुधवारी राज्य सरकारची कॅबिनेट बैठक पार पडली. या बैठकीला कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो उपस्थित होते. यावेळी बैठकीला जाण्यापूर्वी पर्यटन, कोविड लसीकरण आणि बायंगिणी कचरा प्रकल्पाविषयी त्यांनी भाष्य केलंय.

पर्यटन तसंच कोविड लसीकरणाविषयी बोलताना मायकल लोबो म्हणालेत, राज्यात हळूहळू पर्यटन सुरु झालंय. आरटीपीसीआर चाचण्या करुन पर्यटक येत आहेत. थोड्या दिवसांनी राज्यात पर्यटन पूर्वीप्रमाणे सुरु होईल. तोपर्यंत सरकारनं गोंयकारांना लसीकरणाचे दोन्ही डोस देऊन पूर्ण केले पाहिजेत.

बायंगिणी कचरा प्रकल्पाला विरोध असलेल्यांना आव्हान देताना मंत्री लोबो म्हणालेत, बायंगिणी कचरा प्रकल्पाची कागदोपत्री तयारी सुरू आहे. प्रकल्पाला हायकोर्ट आणि एनजीटीकडून मान्यता मिळालीये. तरीही बरेच जण या प्रकल्पाला विरोध दर्शवतायत. ज्यांना कुणाला या प्रकल्पाला विरोध करायचाय, त्यांनी हायकोर्टात जावं.

अजून काय म्हणालेत मंत्री मायकल लोबो, त्यासाठी खालील व्हिडिओ पहाः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!