‘त्या’ नराधमांना पोलिसांनी अद्दल घडवलीच नव्हती, कैद्यांनीच केलं बलात्काऱ्यांचं रॅगिंग

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसा : कोलवाळ कारागृहात फिल्मी स्टाईलचे, कैद्यांच्या उपोषणाचे व इतर घटनांचे चित्रीकरण केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. आता तर कैद्यांना नग्न करून त्यांना उठाबशा काढायला लावलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाणावलीतील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारातील चार कैद्यांपैकी तिघांना शिक्षा देणारा हा रँगीगचा प्रकार इतर कैद्यांनी केलेला आहे. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनात खळबळ माजलीये. कारागृहात सर्रासपणे मोबाईल फोनचा वापर होत असल्याचंही यावरून पुन्हा सिध्द झाले असून कारागृहात कैदीराज चालल्याचं अधोरेखित झालंय.

बाणावली समुद्रकिनारी घडलेल्या दोघा अल्पवयीन युवतींवरील लैगिक अत्याचाराचं प्रकरण गेल्या महिन्यात गाजलं. मुख्यमंत्र्यांनी या प्रकारावरील एका वक्तव्यांमुळे तर हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर चर्चेस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी एका सरकारी कर्मचार्यासह चार जणांना अटकही केली होती. दरम्यान, सुरुवातील पोलिसांनीच या कैंद्याला अद्दल घडवल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजबच हकीकत समोर आली आहे.
हेही वाचा – SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा
ती शिक्षा पोलिसांनी नव्हे तर चक्क तुरूंगातील कैद्यांनीच केल्याचे आता उघड झाले आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली शिक्षा भोगणारे कैदीही या लांच्छनास्पद कृत्यामुळे बरेच संतापले आणि त्यांनी या बलात्कार प्रकरणातील आरोपींना ही शिक्षा केली असल्याचा सूर उमटतोय.
ही रँगिंगची घटना कारागृहातील क्वारंटाईन सेल विभागात घडली आहे. चारही संशयितांची गुरूवारी कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. त्यातील एक कोरोना बाधित सापडल्याने त्याला कारागृहातील पनीशमेंट सेल विभागात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर इतरांना क्वारंटाईल सेल विभागात ठेवण्यात आले आहे.

या विभागातील इतर कैद्यांनी लैंगिक अत्याचार करणार्या या तिघांना विवस्त्र केलं व त्यांना नग्न अवस्थेत उठाबशा काढाव्या लावल्या. बलात्कार केल्याची शिक्षा म्हणून ही शिक्षा कैद्यांकडूनच त्या संशयितांना देण्यात आली आहे. हा प्रकार कारागृहातीलच असल्याची माहिती कारागृहातील सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा – धक्कादायक! हा Video पाहा आणि तुम्हीच सांगा या अपघाताला कारणीभूत कोण ते!
दरम्यान गेल्या ऑगस्ट 2020 मध्ये नुकतीच हत्या झालेल्या अनवर शेख यानेही फिल्मी स्टाईलमध्ये आपला व्हिडीओ चित्रीत करून सोशल मीडियावर टाकला होता. हल्लीच अनवर शेख याचा शिरसी कारवार येथे निर्घृणपणे खून करण्यात आलाय. हा व्हिडीओ काढल्यानंतर त्याच्यावर मडगावमध्येही हल्ला झाला होता.
हेही वाचा – गोव्यापासून 450 किमीवर आढळलेल्या 22 किलोच्या घोळ माशाला लाखोंची बोली
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा – गोव्यात पोस्टिंग झालेल्या लेडी सिंघम अस्लम खान यांचा थक्क करणारा जीवनप्रवास