ऐकावं ते नवलंच! बदली रद्द करण्यासाठी दिलं ‘हे’ कारण

बार्देश गट विकास कार्यालयातील प्रकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः सरकारी नोकरी मिळवण्यासाठी, योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा बदल्या टाळण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करुन लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच एक प्रकार बार्देश तालुक्यातील गट विकास कार्यालयात घडला आहे. दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलेली बदली रद्द व्हावी, यासाठी कोविड बाधित असल्याचा बनावट दाखला सादर करण्याचा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचाः गोव्यातील पोलीस आणि अधिकारी मॅनेज होऊ शकतील

बदली रद्द करण्यासाठी बनला कोविड पॉझिटिव्ह

उपलब्ध माहितीनुसार तालुक्यातील गट विकास कार्यालगत कनिष्ठ अभियंता म्हणून सेवा बजावलेले फुटुसिंग शेटगांवकर यांनी पणजीतील कार्यालयात पंचायत संचालनालयात झालेली बदली रद्द करण्यासाठी बनावट कोविड बाधित असल्याचा दाखल सादर केला. हा दाखला मिळवून पणजीतील बदली रद्द करुन, ती पेडणे येथे करण्यास शेटगांवकर यशस्वी ठरले असले, तरी समोर आलेल्या या प्रकाराची गट विकास कार्यालयातून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

हेही वाचाः कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलनुसार प्लेगची व्हॅक्सिन तयार; 40 लोकांवर होणार ट्रायल

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बदलीचा आदेश केला होता जारी

बार्देशातील कार्यालयातून शेटगांवकर यांच्या बदलीचा आदेश जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जारी करण्यात आला. त्याच दरम्यान १७ जून रोजी आपण कोविड पॉझिटिव्ह असल्याचा हळदोण आरोग्य केंद्रावरील दाखला त्यांनी कार्यालयात सादर केला. त्यामुळे नियमानुसार बाधित झाल्याने विलगीकरणासाठी त्यांना १० दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा सेवेत दाखल होण्यासाठी तंदुरुस्तीचा हळदोण केंद्रावरील दाखला त्यांनी आपल्या कार्यालयात सादर केला . दिलेल्या दाखल्यावर संशय आल्यानं गट विकास कार्यालयातून अंतर्गत चौकशीला आरंभ करण्यात आली. आरोग्य केंद्राशी पत्रव्यवहारही करण्यात आला. चौकशीअंती त्याचा हळदोण केंद्रावरुन मिळवलेला दाखला बनावट असल्याचे आढळून आलं होतं.

हेही वाचाः सासष्टीतही कागदपत्रांत बेकायदा फेरफार करून जमिनी हडप

आरोग्य केंद्राने तंदुरुस्तीचा दाखला २६ जुलै रोजी मागे घेतला

आरोग्य केंद्राने त्याचा तंदुरुस्तीचा दाखला दि.२६ जुलै रोजी मागे घेण्यात आला. तशा आशयाचे पत्र शेटगांवकर तसंच गट विकास कार्यालयात पाठवण्यात आलं होतं. दि.३० जून रोजी त्याला मुक्त करण्यात आलं. दि. १ जुलैपासून तो सध्या पेडणे येथील कार्यालयात कर्यरत आहे.

हेही वाचाः गोवा दिवाळखोरीच्या दिशेने चाललायः सुदीन ढवळीकर

हळदोण आरोग्य केंद्राने कोविड पॉझिटिव्ह दाखला दिला नाही

फुटूसिंग शेटगांवकर यांना कोविड पॉझिटिव्ह असल्याचा दाखला आरोग्य केंद्राकडून देण्यात आलेला नाही. त्यांना केंद्रावर चाचणीही केलेली नाही. त्यामुळे बोगस दाखल्याच्या आधारावर त्यांनी घेतलेला तंदुरुस्तीचा दाखला केंद्राकडून मागे घेतला आहे, असं हळदोण आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीम नाईक म्हणाल्या.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | Details | अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात नेमकं काय काय घडलं?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!