ही आजची गर्दी; उद्या तर मुख्य बाजार; उद्या काय?

म्हापशातील काळजी करायला लावणारी गर्दी

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः राज्यातील दिवसागणित कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत जरी आटोक्यात असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे अजूनही प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यव्यापी कर्फ्यूचा कालावधीही वाढवून 21 जूनपर्यंत करण्यात आलाय. मात्र लोकांना मात्र त्याचं गांभीर्य असलेलं अजूनही दिसत नाही. विनाकारण घराबाहेर पडू नको म्हटलेलं असताना लोक मात्र विविध कारणं शोधून घराबाहेर पडतायत आणि उगाच गर्दी करतायत. याचा पुरवा म्हणजे आजचे म्हापसा बाजारपेठेतील फोटो.

हेही वाचाः सोन्याचा किंमतीत मोठी घसरण, तोळ्याचे नवे दर किती?

लोकांकडून बाजारपेठेत विनाकारण गर्दी

उद्या म्हापशातील बाजाराचा दिवस आहे. मात्र आदल्या दिवशीचे म्हापसा बाजारपेठेतील फोटो मात्र काळजी करायला लावणारे आहेत. आदल्या दिवशी एवढी गर्दी, तर बाजाराच्या दिवशी काय चित्र असेल, त्याची कल्पना या फोटोंवरून करता येते. गुरुवारी हाती आलेले म्हापसा बाजारपेठेतील फोटो पाहता लोक बाजारात विनाकारण गर्दी करत असल्याचं चित्र समोर आहे. यावरून लोकांचा बेदरकारपण वाढल्याचं स्पष्ट होत आहे. हेच ‘सुपर स्प्रेडर’ असल्याचं बोललं जात आहे.

शासकीय यंत्रणा सांगून थकल्या

नागरिकांना घरातच थांबण्याचं आवाहन केलं असतानाही शहरात अक्षरश: सामाजिक अंतर ठेवण्याच्या धोरणाचा बट्ट्याबोळ झालेला बघावयास मिळतोय. सुरक्षित अंतर ठेवून उभे राहण्याचे कुठलेही नियम पाळले गेल्याचं दिसून आलं नाही. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवण्याचं आवाहन सर्वच शासकीय यंत्रणांतर्फे सातत्याने केलं जात असलं तरी अनेक या फोटोंमध्ये रस्त्यांवर लोकांनी गर्दी केलेली दिसतेय.

हेही वाचाः संततधार पावसामुळे राज्यात भाजीपाल्याच्या किमती वाढल्या

कोरोनाचं संकट अद्याप ठळलेलं नाही

सुरुवातीला म्हापशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. म्हापसा कोरोनाचा हॉटसॉप होता. लॉकडाऊननंतर रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली होती. मात्र तरीही संकट अद्याप ठळलेलं नाही. यामुळेच विनाकारण फिरणाऱ्या या लोकांवर पोलीस प्रशासन यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी सर्वस्तरातून केली जात आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!