रुग्णवाहिकेची ही अवस्था! तर आरोग्य यंत्रणेचं काय झालं असेल?

रुग्णवाहिकाच 'सलाईन'वर!; आरोग्य खात्याच्या पेडणे आरोग्यकेंद्राच्या रुग्णवाहिकेची दुर्दशा, फोटो समोर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पेडणे आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर आली आले. रुग्णांच्या सोयीसाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचा एक हृदयात धडकी भरवणारा फोटो समोर आला आहे. या रुग्णवाहिकेचा चालक स्वतःचा जीव धोक्यात घालून ही रुग्णवाहिका चालवत असल्याचंच या फोटोतून दिसतंय.

नक्की काय झालंय?

नुकताच एका रुग्णवाहिकेचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये रुग्णवाहिकेची झालेली दुर्दशा, त्याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. रुग्णवाहिकेचं चालकाच्या बाजूचं दार चक्क कपड्याने बांधून चालक रुग्णवाहिका चालवत असल्याचं दिसतंय. या दाराचं लॉकिंग खराब झाल्यानं चालकावर असा उपाय करून रुग्णवाहिका चालवण्याची वेळ आलीए. थोडक्यात चालक आपला जीव धोक्यात घालून रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम करतोय.

फोटो समोर

म्हापसा शहरातील कोर्ट जंक्शनजवळ या रुग्णवाहिकेचा फोटो टिपण्यात आलाय. या फोटोतून सरळ सरळ रुग्णवाहिकेची झालेली दुर्दशा दिसतेय. हा फोटो समोर आल्यानंतर आरोग्य खात्याच्या आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या रुग्णवाहिकाच ‘सलाईन’वर असल्याचं म्हणावं लागेल.

सुरुवातीला हा फोटो पेडणे आरोग्य केंद्राचा असल्याचं सांगत व्हायरल केला जात होता. दरम्यान, आता जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार ही रुग्णवाहिका पेडणे आरोग्य केंद्रातील नसल्याचं स्पष्ट झालंय. गोवन वार्ता लाईव्हच्या प्रतिनिधींनी जेव्हा याबाबत पडताळणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पेडणे आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी ही रुग्णवाहिका पेडणे आरोग्य केंद्राची नसल्याचं सांगितलंय.

ती रुग्णवाहिका आम्ही मागच्या दिवसात शिवोलीतील हॉस्पिटल की आझिलो हॉस्पिटलला दिली होती. पेडणे आरोग्य केंद्राकडे सध्या तीन रुग्णवाहिका आहेत. त्यातील विंगर गाडी बंद स्थितीत आहे. टेम्पो ट्रॅव्हरल आहे ती सुस्थितीत असून तिचा उपयोग केला जातोय. तसंच अजून एक रुग्णवाहिका कोविड वॉरियर्सना म्हणून नुकतीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, असं पेडणे आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. विद्या म्हणाल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!