कुजीरा ॲथलेटिक स्टेडियमचा असाही होतोय वापर

एफसी गोवा फुटबॉल संघाला सरावासाठी दिलंय मैदान; ॲथलेटिक ट्रॅकचं होतंय नुकसान; गोवा ॲथलेटिक संघटनेकडून नाराजी व्यक्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कुजीरा येथे लुसोफोनिया गेम्ससाठी उभारण्यात आलेल्या ॲथलेटिक स्टेडियमचा वापर कसा करायचा हेदेखील आता क्रिडा खात्याला कळत नाहीये. हे स्टेडियम सध्या एफसी गोवा फुटबॉल संघाला प्रॅक्टिससाठी देण्यात आलंय. यासाठी क्रिडा खात्याला किंवा एसएजीला शुल्कापोटी पैसाही मिळत असेल, परंतु या स्टेडियमवर कोट्यावधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेला ॲथलेटिक ट्रॅक खराब केला जातोय, याकडे एसएजीचं लक्षच नाहीये.

हेही वाचा – दुसरी लाट नाही तर काय? 24 तासांत तब्बल 90 हजार नवे रुग्ण, 250पेक्षा जास्त मृत्यू

मुख्यमंत्र्यांना दिली माहिती

या ॲथलेटिक ट्रॅकची नीट काळजी घ्यावी लागते. याठिकाणी फुटबॉल खेळाडू मात्र फुटबॉलचे स्टर्ड्स शू घालून अगदी मुक्तपणे ॲथलेटिक ट्रकवर सराव करताना दिसताहेत. गोवा ऑलिंपिक संघटनेने या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतलाय. परेश कामत यांनी यासंबंधी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना माहिती दिलीये. कुजीरा स्टेडियमच्या ॲथलेटिक ट्रॅकचा सांभाळ करण्याचे आदेश क्रिडा खात्याला, किंबहुना एसएजीला देण्यात यावेत, असंही त्यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!