‘हे’ १५ पोलिस मेळावलीतील धुमश्चक्रीत जखमी

या धुमश्चक्रीत जखमी झालेल्या १५ पोलिसांची नावं समोर आलीत.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

वाळपईः सत्तरी तालुक्यातील गुळेली पंचायत क्षेत्रातील शेळ मेळावली या ठिकाणी होणार असलेल्या आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाने संपूर्ण गोव्याचं लक्ष वेधून घेतलंय. शुक्रवारी शेळ-मेळावलीत तणावपूर्ण शांतता पहायला मिळाली. गुरुवारी आंदोलकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे वाळपईत मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. संपूर्ण वाळपई शहराला पोलीस ठावणीचं स्वरूप प्राप्त झालंय. शेळ मेळावलीत बुधवारी दगडफेक, लाठीचार्ज अशी सगळी धुमश्चक्री पहायला मिळाली. मेळावलीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं. काही पोलिस जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यानंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. आजूबाजूच्या गावातील लोकही मेळावतीली लोकांच्या मदतीला धावलेत. पोलिसांसोबत झालेल्या धुमश्चक्रीनंतर आक्रमक ग्रामस्थांनी वाळपई पोलिस स्थानकाच्या दिशेने मोर्चा काढलेला.

१५ पोलिस मेळावलीतील धुमश्चक्रीत जखमी

शेळ-मेळावली प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर दडपशाही केल्याचं स्पष्ट असूनही सरकारने मात्र आंदोलक ग्रामस्थांवर कठोर कारवाई करण्याचे निश्चित केलेय. बुधवारी शेळ- मेळावलीत झालेली हिंसक घटना ही नियोजितबद्ध असल्याचा ठपका ठेवून 23 जणांवर गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आलाय. या धुमश्चक्रीत जखमी झालेल्या १५ पोलिसांची नावं समोर आलीत.

कोण आहेत हे पोलिस?

शेळ-मेळावली धुमश्चक्रीत जखमी झालेले १५ पोलिस या महिला आहेत. यामध्ये जेनिफर फर्नांडिस, नितू नाईक, दिया गोसावी, सिया वेळीप, पूनम प्रभू, अंकिता म्हार्दोळकर, दिया वरक, दिशा पागी, प्रीतम गावकर, रेहाना फळदेसाई, सुषमा गावकर, पूजा गावस, पूनम हळदणकर, गौरी गांवकर आणि प्रतिज्ञा नाईक यांचा समावेश आहे. काही जणींना हाता-पायांना दुखापत झाली आहे, तर काहींच्या डोक्याला जबर मार बसला आहे. जखमी पोलिसांवर जीएमसीत औषधोपचार सुरू आहेत.

शेळ मेळावलीत झालेल्या प्रकारानंतर सगळेच मनातून हादरलेत. आयआयटीला विरोध करताना शेळ मेळावलीवासी एवढं रौद्ररुप धारण करतील याचा कुणीच स्वप्नातही विचार केला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!