हे सुद्धा दिवस निघून जातील

कवी विवेक चौधरी यांच्या "हे सुद्धा दिवस निघून जातील...." या कवीतेवर आधारलेला लघुपट

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : जगात सध्या कोरोना महामारीने थैमान घातलंय. रोज होणारे मृत्यू, आपलं माणूस गेल्यानंतर त्याच्या आप्तस्वकियांकडून होणारा तो आक्रोश सगळं निराशाजनक आहे. असं म्हणतात की दिवस कायम तसेच उरत नाहीत. ते बदलतात. याच संकल्पनेवर आधारित एक लघुपट एलएमटीम फिल्म्स गोवा यांनी Being_siddheshparab या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तयार केलाय. कवी विवेक चौधरी यांच्या “हे सुद्धा दिवस निघून जातील….” या कोरोना महामारीवरील कवीतेवर हा लघुपट आधारलाय. या लघुपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन संकेत शेट्ये आणि संगम शिंदे यांचं असून कॅमेरा आणि एडिटिंगचा भाग संगम शिंदेंनी सांभाळलाय. या लघुपटातून त्यांनी छोटासा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न केलाय, काय आहे तो संदेश, त्यासाठी जरूर खालील लिंकवर क्लिक करून हा लघुपट पहा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!