‘हे’ आहेत पेट्रोल-डिझेल चे नवे दर…

पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा अबकारी कर 9.50 रुपयांनी कमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा अबकारी कर 9.50 रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी केली. यामुळे रविवार सकाळपासून पेट्रोलच्या दरात 9.50 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट झाली. राज्यात सकाळपासून पेट्रोलचा दर 97.66 रुपये तर डिझेलचा दर 90.21 रुपये एवढा आहे.
हेही वाचाःम्हापसात कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरचे टॅक्स कमी करावेत

पेट्रोल-डिझेलवरच्या टॅक्समुळे राज्याच्या तिजोरीत भर पडत असली तरी त्यामुळे नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरचे टॅक्स कमी करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. जगात निर्माण झालेल्या युद्धस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. जागतिक संकटाच्या काळात आपल्यासमोरील आव्हान वाढले आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील ताळमेळ वाढवण्याची आवश्यकता आहे, असेही मोदींनी म्हटले होते.
हेही वाचाःयेत्या शैक्षणिक वर्षातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बातमी, वाचा सविस्तर…

निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा

केंद्राने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये देखील एक्साईज ड्युटीमध्ये कपात केली होती. तेव्हा सरकारने पेट्रोल ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांचा कर कमी केला होता. सध्या पेट्रोलवर एक्साईज ड्युटी २७.९० रुपये प्रतिलीटर आणि डिझेलवर २१.८० रुपये आकारली जाते. कपातीनंतर आता पेट्रोलवर १९.९० व डिझेलवर १५.८० रुपयांचे उत्पादन शुल्क राहील.७ एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल व डिझेलच्या दरात साधारण १० रुपये प्रतिलीटर एवढी वाढ झाली आहे. यामुळे महागाई देखील वाढू लागली आहे. दुधापासून सर्व पदार्थांच्या दरात, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचाःएवढ्या रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार !

काही राज्यांनी कर कमी केले

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क नोव्हेंबर महिन्यात कमी केले होते. राज्य सरकारांनीही कर कमी करावेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत काही राज्यांनी कर कमी केले. मात्र, काही राज्यांनी कर कमी केले नाहीत. नोव्हेंबरमध्ये जे करायचे होते ते काम आता व्हॅट कमी करून नागरिकांना दिलासा द्या, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.
हेही वाचाः’गोवन वार्ता लाईव्ह’च्या किशोर नाईक गावकरांना पत्रकारिता पुरस्कार जाहीर…

इतर घोषणा…

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सिलिंडरवर यंदा २०० रुपये सबसिडी दिली जाईल. एका कुटुंबाला वर्षभरात १२ सिलिंडर मिळतील. याचा ९ कोटी कुटुंबांना लाभ होईल.
  • प्लास्टिक उत्पादनांच्या कच्च्या मालावरील उत्पादन शुल्कही कमी करण्यात येईल. जिथे आयातीवर आपले अवलंबित्व जास्त आहे.
  • काही स्टील उत्पादनांच्या कच्च्या मालावरील आयात शुल्कही कमी केले जाईल. त्याचबरोबर काही पोलाद उत्पादनांवर निर्यात शुल्क आकारण्यात येईल.
  • सिमेंटची उपलब्धता वाढवण्यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. उत्तम लॉजिस्टिकमुळे सिमेंटची किंमत कमी होईल.
    हेही वाचाःअटल सेतू वाहतूकीसाठी बंद होणार?
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!