‘या’ ६ धक्कादायक घटनांनी सिद्ध केलं, कायद्याचा धाक उरलेला नाहीच!

वाचा गेल्या काही दिवसांतील विचित्र घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

१. गोळीबारानं खळबळ

गोळीबाराच्या घटनेनं दक्षिण गोव्यात खळबळ उडाली आहे. गोळीबार करण्यात आलेल्याला नंतर मृत घोषित करण्यात आलंय.

२. रेती व्यावसायिकाचा खून

रेती व्यानसायिकाच्या हत्येचं गूढ कधी उकलणार, असा सवाल उपस्थित झालाय. स्कूटीवरुन जाणाऱ्या एका रेती व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येचं गूढ असूनही कायम आहे.

३. नारायण नाईक हल्ला

नारायण नाईक यांच्यावर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी दोघांनी बाईकवरुन येत नारायण नाईकांवर हल्ला केल्यानं खळबळ उडाली होती.

४. चोरट्यांचा सुळसुळाट

म्हापशा पोलिसांनी एक संभाव्य चोरी रोखली होती, तर मंगळवारी एका प्रकरणात चोरट्यांना पकडण्यात आलं होतं.

५. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

काही अल्पवयीन मुली गरोदर राहिलानंतर त्यांच्यावर बलात्कार झाल्याचं समोरं आलं होतं. तर अपहरण आणि अत्याचाराच्या घटनांनीही खळबळ उडाली होती.

६. एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येनं पोलिसांच्या कारभारावरही सवाल उपस्थित केले होते. पोलिसांच्या जाचाला कंटाळून तिघांनी आत्महत्या केल्याचा सनसनाटी आरोप करण्यात आल्यानं पोलीसच संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते.

या सगळ्या सोबतच Gangwar सारखी घटनाही पणजीतील ताळगावात घडल्याचं समोर आलं होतं. एकूणच या सर्व घटनांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थ्वरच सवाल उपस्थित केलेत. त्यामुळे गोव्याचा बिहार तर होत नाहीये ना, असा सवाल सामान्य गोंयकार उपस्थित करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!