25 जुलैपर्यंत सत्तरीत पाणी पुरवठा नाही?

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपईः दाबोस जल प्रकल्पाला पुराच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. यामुळे या प्रकल्पातील यंत्रणा बिघडलीये. परिणामी २४ आणि २५ जुलै रोजी सत्तरी तालुक्यात पाणी पुरवठा हाेणार नसल्याचं समजतंय. वाळपई सार्वजनिक पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिलीये. तसं प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलंय.

दाबोस पाणी प्रकल्पाला पुराच्या पाण्याचा फटका
शुक्रवारी सत्तरी तालुक्यात पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने दाबोस पाणी प्रकल्पाची यंत्रणा पाण्याखाली गेली. वीज यंत्रणेचंही नुकसान झालंय. त्याचप्रमाणे प्रकल्पाच्या यंत्रणेमध्ये पाणी घुसलंय. प्रकल्पाच्या शेजारी असलेली दरड कोसळल्यामुळे प्रकल्पाची यंत्रणा बंद पडलीये. यामुळे 24 आणि 25 जुलै असे दोन दिवस सत्तरीत पाणी पुरवठा होणार नसल्याचं सहाय्यक अभियंता सोमा नाईक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केलंय. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावं, असं आवाहनही करण्यात आलंय.

राज्याला पुराचा फटका
गेले काही दिवस अविरत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्याच्या विविध भागात पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. राज्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यानं नद्यांनी रौद्ररुप धारण केलं. अनेकांच्या घरात पाणी शिरलं, तर काही ठिकाणी घरकुलचं मोडून पडलीत. त्यामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ आलीये. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना संयम बाळगण्याचं सरकारने आवाहन केलंय.