वेळीच रुग्णालयात दाखल व्हा, वैद्यकीय सुविधांची कमतरता नाही – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या गोंयकारांना ट्विटद्वारे आवाहन

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळ्यांनाच चिंतेत आणलंय. रोज हजारांच्या घरात वाढणारी कोविड बाधितांची संख्या, मृतांच्या आकड्यांमध्ये होणारी वाढ, लोकांचा निष्काळजीपणा, वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी लोक करत असलेला वेळकाढूपणा, सगळंच भयंकर आहे. हे प्रकार असेच सुरू राहिले तर येणाऱ्या काळाच परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीये. राज्यात कोरोनाचं वाढतं साम्राज्य पाहता मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून गोंयकारांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | कोरोना ब्रेकिंग ! 17 मृत्यू, 940 नवे रुग्ण, याहीपेक्षा चिंताजनक आकडेवारी ‘ही’ आहे

वेळेत रुग्णालयात दाखल व्हा

वैद्यकीय सुविधांची कमतरता नाही, असं ठामपणे सांगताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लोकांना कोविड-१९ लक्षणं असल्यास वेळेत रुग्णालयात दाखल होण्याचं आवाहन केलं आहे. कोविड-१९ संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीव मुख्यमंत्र्यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा ट्विटद्वारे जनतेला आवाहन याविषयी आवाहन केलं.

मुख्यमंत्र्यांचं ट्विट….

कोविडमुळे आज राज्यात झालेल्या मृत्यूंच्या संख्येमुळे मी खूप अस्वस्थ झालोय. बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णालयात उशिरा दाखल झाल्यामुळे मृत्यू झाले असल्याचं दिसून आलं आहे. म्हणून मी सर्वांना नम्र विनंती करतो की त्यांनी कोविडची लक्षणं गांभीर्याने घ्यावीत आणि लगेच जवळच्या रुग्णालयातून मदत मिळवावी. वैद्यकीय सुविधांची कमतरता नाही. वैद्यकीय सेवेला उशीर केल्यानं बरे होण्याची शक्यता कमी होईल, असंही त्यांनी सांगितलंय.

सोमवारी 17 जणांचा मृत्यू

सोमवारी राज्यात १७ जणांचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या लाटेतला आत्तापर्यंतचा मृतांचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दररोज ९०० लोकांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह येतेय. त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. गरज भासल्यास वैद्यकीय मदत घेण्यापासून मागे-पुढे करू नका. कोविडची कोणतीही लक्षणं दिसल्यास थोडासुद्धा उशीर न करता जवळच्या हॉस्पिटलमधून लगेच मद मिळवा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!