भाजप सोडण्याचा प्रश्नच येत नाही; मॉविनची प्रतिक्रिया मी महत्त्वाची मानत नाही

कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणांची स्पष्टोक्ती

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः भाजप सोडण्याचा प्रश्नच येत नाही; मॉविनची प्रतिक्रिया मी महत्वाची मानत नाही. अशी प्रतिक्रिया कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी बुधवारी दिली. एलिना साल्ढाणा भाजप सोडणार असल्याचे तर्क वितर्क बोलले जात होते. त्याविषयी साल्ढाणा यांनी वरील स्पष्टोक्ती दिली. तसंच आगामी विधानसभा निवडणूक मी भाजपच्या तिकिटावर लढणार असल्याची पुष्टी त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचाः सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार; २०२१ साठी आमंत्रिक केली नामांकने

मॉविन पक्षाचा वरिष्ठ नाही

गुदिन्हो यांनी पणजीत कुठ्ठाळीचा चेहरामोहरा बदलणार असल्याचं बोलून दाखवलं होतं. याविषयी आपलं मत स्पष्ट करताना साल्ढाणा म्हणाल्या, कोणताही निर्णय घेण्यासाठी मॉविन पक्षाचा वरिष्ठ नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या कोणतीच वक्तव्य माझ्यासाठी महत्त्वाची नाहीत. पक्ष श्रेष्ठींनी असं कोणतंच वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे यावर विचार करण्याचा किंवा माझं मत देण्याचा प्रश्नच येत नाही, असं साल्ढाणा म्हणाल्या.

मॉविनने केलेल्या कोणत्याच वक्तव्यात तथ्य नाही

मॉविनने केलेल्या कोणत्याच वक्तव्यात तथ्य नाही. मी भाजप सोडण्याचं कोणतंही कारण नाही. मी भाजपमध्येच राहून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे. कुठ्ठाळी मतदारसंघातील लोकांसाठी काम करत राहण्याचा माझा हेतू आहे, असं साल्ढाणा म्हणाल्या.

हेही वाचाः पक्षातील नेतेच पेरतात माझ्याविषयी अफवा

कुठ्ठाळी मतदारसंघातील केळशी येथील चर्च हॉलमध्ये कुठ्ठाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील भाष्य केलं.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Ragging of Rapist | बलात्कारप्रकरणातील संशयितांचं कारागृहात कैद्यांकडूनच रॅगिंग?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!