53rd IFFI 2022: भारतीय सिनेसृष्टीइतके सुंदर क्षेत्र नाही…

अनीस बज्मी : सिनेसृष्टीतील ‘कॉर्पोरेट संस्कृती’ विषयावर मास्टर क्लास

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : चित्रपट क्षेत्राला नेहमीच लक्ष्य केले जाते. सतत या क्षेत्रातील लोकांवर ड्रग्ज, मद्यपान व नाना प्रकारचे आरोप केले जातात. हे क्षेत्र वाईट असल्याचे सांगितले जाते. मात्र, या क्षेत्रात जितके भावनिक लोक आहेत, तितके दुसरीकडे कुठेच नाहीत. भारतीय सिनेसृष्टीइतके सुंदर क्षेत्र नाही, असे प्रतिपादन दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी केले.
हेही वाचाः२८ निरीक्षकांच्या बदल्या…

सिनेसृष्टीतील ‘कॉर्पोरेट  संस्कृती’ या विषयावर आयोजित मास्टर क्लासमध्ये ते बोलत होते. सिने क्षेत्र खूप बेभरवशाचे आहे असे म्हटले जाते. मी गेली अनेक वर्षे या क्षेत्रात आहे. मला असे कधीच वाटले नाही. एकमेकांना मदत करणारे, कलेला सर्वोच्च मानणारे खूप लोक इथे आहेत, असे ते म्हणाले.

२००० साली भारतीय सिने व्यवसायात ही संस्कृती सुषमा स्वराज यांच्या दूरदृष्टीतून आली. पण अद्याप ती आपल्याकडे पूर्णतः रुजलेली नाही. इथे एकीचा बराच अभाव दिसून येतो, असे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी सांगितले.
हेही वाचाःइस्रोचे पीएसएलव्ही-सी५४ मिशन लाँच…

कार्पोरेटच्या आधी चित्रपट बनवायला खूप वेळ लागत असे. १-२ वर्षाचा कालावधी लागत असे. पण आता सिनेमांची संख्या वाढली. विविध व्यासपीठांमुळे संधी उपलब्ध झाल्या. आर्थिक गणित चांगले झाले असल्याचे मत बज्मी यांनी व्यक्त केले. अनेकांनी आपली संपत्ती पणाला लावून चित्रपट केले असल्याचे सांगताना त्यांनी राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर या सिनेमाचे उदाहरण दिले.

नव्याने या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांना आघाडीच्या दिग्दर्शक, निर्माता यांच्याशी जोडता यावे यासाठी लवकरच एक ॲप्लिकेशन घेऊन येणार आहोत अशी घोषणा यावेळी मुकेश छाब्रा यांनी केली. महावीर जैन यांनीही चर्चेत सहभाग घेतला. कोमल नाहटा यांनी संपूर्ण सत्राचे नियंत्रक म्हणून काम केले. प्रश्नोत्तराच्या सत्रात प्रेक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
हेही वाचाःवागातोरमधील बांधकामाला कारणे दाखवा नोटीस…

सृजन आणि हुशारी एकत्र आल्यास सर्वांगसुंदर सिनेमा

कार्पोरेट संस्कृतीमुळे व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेले लोक केवळ व्यवसायाच्या दृष्टीने सिनेमांसाठी पैसे गुंतवण्यास इच्छुक दिसतात. या प्रक्रियेत जर कलाकार, सृजनात्मक व्यक्तींना समाविष्ट केले व या दोघांनी एकत्र येऊन काम केले तर सर्वांगसुंदर सिनेमा बनवू शकतात, असे बज्मी यावेळी म्हणाले.
हेही वाचाःचार तरुणींचा सेल्फीने घेतला बळी…

उत्तर दक्षिण काही नसते

दक्षिणेचे सिनेमे या काळात खूप गाजत आहेत. त्यांचे हिंदीत रिमेक बनवले जात आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना बज्मी म्हणाले, बऱ्याच वर्षांपासून दक्षिणेत चांगले चित्रपट बनवले जात आहेत. तसेच ते हिंदीतही होत आहेत. काही चालतात काही चालत नाहीत. मात्र, उत्तर दक्षिण असे काही नसते. केवळ भारतीय सिनेसृष्टी एवढेच आहे.
हेही वाचाःChicalim Accident: अल्पवयीन कारचालकाची अपना घरात रवानगी…

कार्पोरेटच्या एक्सेल शीटमुळे पॅशन निघून गेले

कार्पोरेट संस्कृतीत चित्रपटात किती पैसा गुंतवावा लागणार व त्यातून किती फायदा मिळू शकतो, याची एक्सेलशीट आधीच तयार असते. त्यामुळे अनेकजण केवळ फायदा बघतात. बऱ्याच चांगल्या संकल्पना साकारता येत नाहीत. यामुळे चित्रपट निर्मितीचे पॅशन निघून गेले आहे, असे विकास बहल यांनी सांगितले.
हेही वाचाःकर्नाटकातील आठ अल्पवयीन बेपत्ता मुले आढळली गोव्यात…

चित्रपट बॉयकॉटचा संपूर्ण चित्रपट सृष्टीवर परिणाम

हल्लीच्या काळात सिनेमा बॉयकॉट करण्याची एक नवी लाट आली. सिनेमा ही कलाकृती असते. तुम्ही जेव्हा बॉयकॉट करता तेव्हा त्या सिनेमाच्या दिग्दर्शकासह अनेकांवर पर्यायाने चित्रपट सृष्टीवर परिणाम होत असल्याचे चर्चेतून समोर आले.
हेही वाचाःइस्रोचे पीएसएलव्ही-सी५४ मिशन लाँच…

पायरसी विरुद्ध कठोर कायद्याची गरज!

चित्रपट निर्मितीत केवळ निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते नाही तर अनेक छोट्या – मोठ्या कर्मचारी वर्गाचाही समावेश असतो. हे पायरसी करणारे सिनेमा मोफत उपलब्ध करतात. ज्याचा व्यवसायावर परिणाम होतो. अप्रत्यक्ष अनेकांना त्याचा फटका बसतो. म्हणूनच पायरसीविरुद्ध कठोर कायदा झाला पाहिजे, असे मत चित्रपट निर्माता विकास बहल यांनी व्यक्त केले. 
हेही वाचाःVikram Gokhale Passed Away : अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!