चर्च पाडण्यामागे आम आदमीचं सरकार नाही

दिल्ली चर्चचं स्पष्टीकरण; लिटिल फ्लॉवर चर्चने प्रसिद्ध केलं एक निवेदन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: दिल्ली येथील लिटिल फ्लॉवर चर्चने एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यात चर्च पाडण्यामागे आम आदमीचं सरकार नाही, असं स्पष्ट केलं आहे. यामुळे या मुद्द्यावरून गेले दोन आठवडे भाजप, काँग्रेस आणि चर्चिल आलेमाव यांच्यात सुरू असलेलं राजकारण थंड होणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर चर्चचा विश्वास असून ते योग्य न्याय देतील असा विश्वास चर्चने दाखवला आहे.

हेही वाचाः ‘लुई बर्जर’ लाचखोरी प्रकरणी कामत, चर्चिल विरोधात चालणार खटला

दिल्ली सरकारला याबाबत अंधारात ठेवलं

दिल्ली सरकारला न कळता डीडीए चालवण्याच्या उद्देशाने हा विध्वंस झाला, असंही त्यांनी नमूद केलं. चर्च पाडण्याचं काम भाजप प्रणित दिल्ली डेव्हलपमेंट बोर्डने केलं असून दिल्ली सरकारला याबाबत अंधारात ठेवण्यात आल्याचं पत्रकात म्हटलं आहे. हे काम भाजपने केलं हे सिद्ध झालं असताना काँग्रेस आणि आलेमाव हे दोघेही त्यांना दोष का देत नव्हते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पॅरीश प्रिस्ट फेज जोसे कन्नमकुझी यांनी दिलं निवेदन

चर्चच्या पत्राचा पूर्ण मजकूर खालील प्रमाणे आहे. हे निवेदन पॅरीश प्रिस्ट फेज जोसे कन्नमकुझी यांनी दिलं आहे. दिल्लीतल्या आम आदमी पार्टीला किंवा त्यांच्या सरकारला दिल्लीतील लिटल फ्लॉवर चर्च उद्ध्वस्त करण्याविषयी काही माहिती नव्हती या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर आमचा विश्वास आहे.

हेही वाचाः गोव्यातील समुद्र किनारी ‘ब्लू बॉटल जेलिफिश’चा धोका

मुख्यमंत्र्यावर आमचा पूर्ण विश्वास

निवेदनात असंही म्हटलं आहे की, स्थानिक अधिकाऱ्यांनी काही स्थानिक लोकांच्या संगनमताने संबंधित सरकारची माहिती न घेता चर्च पाडलं आहे. मुख्यमंत्र्यांनी हा विध्वंस झाल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे आणि या बाबतीत आमचं संपूर्ण सहकार्य आणि न्याय देण्याची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्र्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचं धार्मिक कार्य चालू ठेवण्यास यापुढे विलंब न करता या प्रकरणाचं निराकरण करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची आम्ही अपेक्षा करतो. म्हणून आम्ही सर्वांना सांगू करतो या घटनेचा राजकीय मुद्दा बनवू नये.

हेही वाचाः फेसबूकवर मैत्री, मैत्रीतून भेट, भेटीदरम्यान लैंगिक अत्याचार! दोघे संशयित गजाआड

चर्चिल अलेमाव दिल्लीत का होते?

आपचे नेते कॅप्टन वेंझी व्हिएगास यांनीही याबाबत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. ते म्हणतात की, चर्चिल अलेमाव दिल्लीत का होते? त्यांना पोलिसांच्या देखरेखीखाली असलेल्या जागेला भेट देण्याची परवानगी कुणी दिली? भाजपमधील कुणाच्या ओळखीने त्यांना तेथे जाण्याची परवानगी मिळाली? लुईस बर्गर प्रकरणात आरोप-पत्र दाखल झाल्यापासून त्यांनी अमित शहा यांच्याशी केलेल्या कराराचा हा भाग आहे का? या सर्वांची उत्तरे गोव्याला माहीत असणं आवश्यक आहे. चर्चिल आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर, स्वत: ला वाचवण्यासाठी त्यांनी भाजपची सेवा सुरू केली आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हेही वाचाः भारतीय निवडणूक आयोगाच्या बैठकीचा अर्थ काय? विधानसभेची निवडणूक लवकर होणार?

ते पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि आलेमाव यांनी गोंयकारांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पत्र त्यांच्या खोट्या गोष्टी उघडकीस आणते. अरविंद केजरीवालच लिटल फ्लॉवर चर्चला न्याय देतील!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!