आश्वेतील रस्त्यावर खड्डेच खड्डे

सार्वजनिक बांधकाम रस्ता विभागाचं दुर्लक्ष

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पावसाळ्यापूर्वी मांद्रे मतदारसंघातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मांद्रेचे आमदार दयानंद सोपटेंना दिलं होतं. आमदार सोपटेंच्या हस्ते दोन महिन्यांपूर्वी रस्त्याच्या हॉटमिक्स दुरुस्तीचं काम करण्यात आलं तेव्हा हे अश्वासन देण्यात आलं. पावसाळा तोंडावर आला तरीही आश्वे मांद्रे रस्त्याला पडलेले खड्डे बुजवले गेले नसल्यानं वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचाः बेकायदा घरांना घरपट्टी कर लागू करण्याचा निर्णय विकासकामांसाठी चालनादायी

रस्त्यावरील खड्डे वेळेत का बुजवत नाही?

आश्वे किनारी भागातील आणि मिनी पार्किंग प्रकल्पाच्या शेजारील रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत, रस्त्यावरील डांबर वर आलंय, गटार व्यवस्था कोलमडलेली आहे, बांधकामं करताना पाणी जाण्यासाठी मार्ग उरलेला नाही. आश्वे किनारी भागातील मिनी पूलाशेजारी ज्या ठिकाणी गोवा पर्यटन खात्याने मिनी पार्किंग प्रकल्प उभारलाय, त्याच्या बाजूच्या रस्त्यावर खड्डे पडलेत. सरकार रस्ता कराच्या नावावर वाहनचालकांकडून पैसे घेतं. मग रस्त्यावर पडलेले खड्डे वेळेतच बुजवण्याचं काम का करत नाही, असा सवाल वाहनचालक करतायत.

हेही वाचाः झुआरी एग्रो केमिकल्सने दिले 50 ऑक्सिजन सिलिंडर

गटार व्यवस्था कोलमडली

सार्वजनिक बांधकाम रस्त्या विभागाच्या अभियंत्यांनी या रस्त्याकडे लक्ष देण्यची गरज आहे. हल्ली त्यांचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय. रस्त्याच्या बाजूला असलेली गटार व्यवस्था कोलमडली आहे. रस्त्याच्या बाजूला झुडपं आणि कपेल जवळील गटारावरील लाद्या मोडकळीस आल्या आहेत. या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी जोर धरत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!