म्हापसा येथील श्री ज्वेलर्स दुकानात चोरी

५ किलो चांदीचे दागिने लंपास; दुकानाच्या मागच्या भिंतीला बोगदा पाडून केली चोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: राज्यात चोरांचा सुळसुळाट झाला आहे. रोज नवनवीन प्रकारे चोरी केल्याच्या घटना ऐकू येत आहेत. चोरीच्या घटनांप्रमाणेच गुन्हेगारीच्या प्रकरणांमध्येही वाढ झालेली पहायला मिळतेय. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झालेली वाढ पाहता गोवा राज्य दुसरं यूपी, बिहार बनण्याच्या दृष्टीने वाटचाल करतंय असंच म्हणावं लागेल. बुधवारी फोंड्यात असाच एक चोरीचा प्रकार घडलाय. त्यामुळे म्हापसावासीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

कुठे झाली चोरी?

बुधवारी सकाळी म्हापसा परिसरात चोरीची घटना घडल्याचं समोर आलंय. म्हापसा येथील एका ज्वेलरच्या दुकानात ही चोरी झाली असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतंय. कोरोना महामारीमुळे वाढलेल्या बेकारीमुळे चोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याचं बोललं जातंय. चोरांचा शोध पोलिस घेत असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचं समजतंय.

कोणत्या वस्तूंची झाली चोरी?

या चोरीच्या घटनेत चोरांनी दुकानातील ५ किलो चांदीचे दागिने लंपास केले असल्याचं समजतंय. आत्तापर्यंत एवढ्याच वस्तू चोरांनी लंपास केल्या असल्याचं पोलिसांकडून समजलंय. अजून कुठल्या वस्तू चोरी झाल्या असल्याचं दुकानाच्या मालकाकडून सांगण्यात आलेलं नाही.

कशी केली चोरी?

आजकाल चोर चोरी करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीक्सचा उपयोग करत आहेत. म्हापसा येथील श्री ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्यासाठी चोरांनी चक्क दुकानाच्या भिंतीला बोगदा पाडून त्या मार्गाने दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील चांदीचे दागिने लंपास केले असल्याचं समजतंय. दुकानाच्या मालकांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली असून लवकरच चोर गजाआड होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हा व्हिडिओ पहाः NO ELECTRICITY | पोस्तवाडा-होंडातील फिरोजा शहांचं कुटुंब अंधारात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!