लोकशाही प्रस्थापित करण्याचं कार्य युवकांनी करावं

अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अखिल यादव यांचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः भाजप सरकारने लोकशाहीची गळचेपी केली आहे.लोकाभिमूख प्रशासनासाठी लोकशाही मूल्यं पाळणं गरजेचं आहे. युवक काँग्रेसने आता लोकशाही बळकट करण्यासाठी वावरावं, असं अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अखिल यादव यांनी म्हटलंय. हळदोण युवक काँग्रेसतर्फे आयोजित बैठकीत बोलताना त्यांनी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पूर्ण जोमाने काम करून काँग्रेस पक्षाला सत्तेत आणण्याचं आवाहन केलं. या बैठकीत हळदोण काँग्रेसचे गट अध्यक्ष आश्विन डिसोजा, उत्तर गोवा युवक काँग्रेस अध्यक्ष विवेक डिसील्वा, उत्तर गोवा युवक काँग्रेस सचिव यश कोचरेकर, सांतआंद्रेचे साईश आरोसकर तसंच नव नियूक्त हळदोण युवक काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल आरोंदेकर आणि इतर उपस्थित होते.

हेही वाचाः CORONA UPDATE | नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला

आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपला पराभूत करून धडा शिकवुया

भाजप हा सत्तेसाठी हपापला आहे. सरळ मार्गे सत्ता स्थापन करता येत नसल्यानं लोकशाहीचा गट घोटून मागील दाराने सत्तेत येण्याचं काम भाजपने केलं आहे. पक्षांतराला प्रोत्साहन देऊन भाजप युवकांसमोर चुकीचं उदाहरण ठेवत आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत लोकांनी भाजपला पराभूत करून धडा शिकवावा, असं अखिलेश यादव म्हणाले.

हेही वाचाः अनुराधा परवार यांना यथाशक्ती मदत करा

राज्याला भाजपने दिवाळखोर केलं

प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी बोलताना भाजप सरकार प्रत्येक महिन्यात कर्ज काढून आपला कारभार हाकत असल्याचं सांगितलं आणि गोवा राज्याला भाजपने दिवाळखोर केल्याचा आरोप केला.

हेही वाचाः विरोधकांना घाबरुनच सरकारचे ३ दिवसांचे विधानसभा अधिवेशन

लोकशाही सांभाळण्यासाठी युवकांनी पुढे यावं

लोकशाही सांभाळण्यासाठी युवकांनी आता पुढे येणं गरजेचं असल्याचं गोवा प्रदेश काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचाः कंधारमध्ये भारतीय पत्रकाराची हत्या

या बैठकीला असंख्य युवक काँग्रेस कार्यकर्ते, सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस पक्ष बांधणीसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महाबळेश्वर तोरस्कर यांनी आभार प्रदर्शन केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!