तरुणीला वाचवण्यासाठी युवकाची मांडवीत उडी

मंगळवार सकाळची घटना; स्थानिक बोट चालकांनी दोघांनाही वाचवलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राजधानीतील मंगळवारची सकाळ एका धक्कादायक घटनेने झालीये. राजधानीतील मांडवी पुलावर सकाळी सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीनं मांडवी पुलावरुन उडी मारली. त्यानंतर या तरुणीला वाचवण्यासाठी तरुणानंही उडी टाकलीये.

हेही वाचाः धक्कादायक : एकाच कुटुंबातील ६ जणांची आत्महत्या !

दोघांनाही वाचवण्यात यश

मांडवी पुलावरुन तरुणीनं उडी टाकल्यामुळे राजधानी पणजीत मंगळवारी सकाळी एकच खळबळ उडाली. दरम्यान, या तरुणीला वाचवण्यासाठी लगचेच एका तरुणानही उडी टाकली. या दोघांनाही वाचवण्यात यश आलंय. स्थानिक बोट चालकांनी या दोघांनाही वाचवलंय. नेमकी या तरुणीनं मांडवी पुलावरुन उडी का टाकली याचं कारण कळू शकलेलं नाहीये. मात्र एकूण या घटनेमुळे खळबळ उडाली होती. सुदैवानं या दोघांचाही जीव वाचलाय. स्थानिका बोट चालकांनी प्रसंगावधान राखत या दोघांनाही सुखरुप बाहेर काढलंय.

मांडवी नदी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी कुप्रसिद्धच

याआधीही अनेकदा अशाप्रकारे मांडवी नदीवरुन उडी टाकून जीव देण्याचे अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे मांडवी नदी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी कुप्रसिद्धच आहे. अशातच मंगळवारी पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. सुदैवानं यातील तरुण-तरुणींना सुखरुप बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.

हेही वाचाः अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी 6,28,993 कोटींच्या पॅकेजची घोषणा

आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही

प्रश्न कितीही कठीण असो, समस्या कितीही मोठी, त्यावर आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. मात्र ही साधी-सोपी गोष्ट आजच्या तरुणाईच्या लक्षात येत नाही. जीवनात यश-अपयश हे येणारच. थोड्या अपयशाने निराश होऊ नये, तर थोड्या बहुत यशाने हुरळून जाऊ नये. स्थिर राहून मार्गक्रमण करून जगलं पाहिजे. समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर मात करणं शिकलं पाहिजे. कारण काहीही झालं तरी आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!