राज्यातील गावे, शहरांची चुकलेली नावे होणार दुरुस्त…

राजभाषा संचालनालयाने घेतला निर्णय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर झळकणाऱ्या नामफलकांवर गावे तसेच शहरांची चुकीची नावे दुरुस्त करण्याचा निर्णय राजभाषा संचालनालयाने घेतला आहे. सध्या ज्या ठिकाणी चुकीची नावे आहेत ती दुरुस्त करून सुधारित नावे संचालनालय सरकारला सादर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
हेही वाचाःउत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ‘पिट बूल’ आणि ‘रॉटवायलर’ या श्वान प्रजातींवर बंदी, ‘कारण’…

काहीच दिवसांत यासंदर्भातील कार्यवाही सुरू होणार

गोव्यातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर गावे तसेच शहरांची नावे चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आलेली आहेत. त्यामुळे गोव्यात येणारे पर्यटक आणि परप्रांतीय कामगार यांच्याकडूनही गावे तसेच शहरांच्या नावांचाही वापर करण्यात येत पोर्तुगीजांच्या उच्चाराप्रमाणेच आहे. त्यामुळेच चुकीच्या पद्धतीने उच्चारण्यात येणाऱ्या गावे तसेच शहरांच्या नावांत दुरुस्ती करण्याचा निर्णय राजभाषा संचालनालयाने घेतला आहे. पुढील काहीच दिवसांत यासंदर्भातील कार्यवाहीही सुरू होणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचाःPFI Banned : ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि संलग्न संघटनांच्या मुसक्या आवळल्या…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!