जलस्त्रोत खात्याचे रेस्ट हाऊस आता फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठीच

डब्ल्युआरडी खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामींकडून परिपत्रक जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः जलस्त्रोत खात्याचे रेस्ट हाऊस आता फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठीच उपलब्ध करून देणार असल्याचं बुधवारी सांगण्यात आलंय. आता फक्त आणि फक्त सरकारी सेवेतील अधिकाऱ्यांनाच या रेस्ट हाऊसचा लाभ घेता येणार आहे. तसे रितसर आदेश जारी करण्यात आलेत. जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी परिपत्रक जारी करत तसे आदेश दिलेत.

हेही वाचाः कॅबिनेट बैठकीत काय काय निर्णय झाले?

नक्की काय म्हटलंय परिपत्रकात?

जलस्त्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलंय की आता सरकारी अधिकारी वगळता इतर कोणालाही जलस्त्रोत खात्याचे रेस्ट हाऊस वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. पूर्वी सामान्य लोकांना ही रेस्ट हाउस वापरण्यास मिळत होती. त्या माध्यमातून सरकारला महसूलही प्राप्त होत असे‌. मात्र आता इथून पुढे तसं करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असं परिपत्रकात म्हटलंय.

ऑनलाईन बुकिंग बंद

हे रेस्ट हाऊस वापरण्यासाठी पूर्वी ऑनलाईन बुकिंगची सुविधा दिली जात होती. मात्र बुधवारी हे परिपत्रक जारी केल्यानंतर आता की सेवा बंद करण्यात आली आहे. आता हे बुकिंग पर्वरी गोवा येथील जलस्त्रोत खात्याचे अभियांत्रिकी अधिकारी यांच्या अधिन असणार आहे.

हा व्हिडिओ पहाः Politics | Bjp | Dabolim | सदानंद शेट तानावडेंचा पत्रकार परिषदेतून खोचक टोला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!