पाणी ओसरलं; कोकण रेल्वे पुन्हा सुरु

शनिवारी पहाटे ३.४५ वाजता ट्रॅक फिट प्रमाणपत्र मिळाल्यावर ही वाहतूक सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वाशिष्ठी नदीचं पाणी ओसारल्यानं कोकण रेल्वे पुन्हा सुरु झालीये. शनिवारी सकाळी पावणेचार वाजता ट्रॅक सुरक्षित असल्याची खात्री करुन वाहतूक सुरू करण्यात आली. कोकण रेल्वेचे अभियंते, कामगारांनी भर पावसात सलग काही तास रात्रभर काम करत मार्ग पूर्ववत केला आहे. शनिवारी पहाटे ३.४५ वाजता ट्रॅक फिट प्रमाणपत्र मिळाल्यावर ही वाहतूक सुरू करण्यात आली असल्याचं समजतंय.

हेही वाचाः चाेडणकरांनी केली वाळपईत पूरग्रस्त भागाची पाहणी

शनिवारी सकाळी राजधानी एक्सप्रेस डाऊन या मार्गवरून रवाना झाली. कोकण रेल्वे मार्ग पूर्ववत झाला असला तरी या मार्गावर सध्या ट्रेन नाहीत. केवळ मार्ग पूर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलं आहे. लवकरच कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची घोषणा होईल, असं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही वाचाः जे पी नड्डा गोव्यात दाखल

गेल्या काही दिवसांपासून कोकण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकण तसंच गोव्यातील नद्यांना पूर आला असून पावसामुळे रस्ते वाहतुकीसह रेल्वे सेवाही प्रभावित झाली आहे. वशिष्ठी नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद होती.

हा व्हिडिओ पहाः FLOOD # INSPECTION- मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त पाहणी दौरा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!