अंजुणे धरणातील पाण्याची पातळी वाढली

कोणत्याही क्षणी धरण होणार ओव्हरफ्लो

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई: मागचे काही दिवस राज्यात पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरू आहे. अक्षरशः पावसाने राज्याला झोडपून काढलंय. राज्यातील नद्या दुथडी भरून वाहत असताना रस्तेही जलमय झालेत. त्याचबरोबर राज्यातील बहुतेक धरणांतील पाण्याची पातळी वाढली असल्याचं बोललं जातंय. अशातच सत्तरी तालुक्याच्या अंजुणे धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लागत असल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असल्याची माहिती हाती येतेय.

हेही वाचाः नवरा शेवटच्या घटका मोजतोय, त्याच्या शुक्राणूपासून मला मातृत्व हवंय, मला परवानगी द्या

वाळवंटी नदीच्या किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सध्या ही पातळी 87.50 मीटरपर्यंत पोहोचली असून येणाऱ्या अवघ्याच दिवसांमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग करता येणार आहे. यामुळे वाळवंटी नदीच्या किनारी असलेल्या पर्ये मोर्ले केरी साखळी आदी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसिंचन खात्याने दिलेला आहे.

हेही वाचाः कर्नाटक सरकारचा ऐतिहासिक निर्णय!

पाण्याची पातळी 87.50 मीटरवर

यासंदर्भाचे प्रसिद्धी पत्रक नुकतंच जाहीर करण्यात आलेलं असून यामध्ये येणाऱ्या दोन दिवसांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. अंजुणे धरणाच्या जलाशयामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा साठा जलद गतीने होऊ लागला आहे. सध्या पाण्याची पातळी 87.50 मीटरवर पोचलेली आहे. एक 89 मीटर पर्यंत पाण्याची पातळी झाल्यास कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. कारण एकूण 89 मीटर पाण्याची पातळी झाल्यास धरणाचा जलाशय तुडूंब भरला जातो.यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाचे दरवाजे उघडून त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असतो.

हेही वाचाः ईद नमाजावर ‘तालिबानी’ दहशत

सध्या ही पातळी अवघ्या 1.50 कमी आहे. सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लागत आहे. यामुळे दोन दिवसात ही पातळी 89 मीटरपर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | AAP | FREE ELECTRICITY | केजरीवालांच्या मोफत विजेच्या घोषणेचे ‘झटके’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!