पिळगाव येथे वाचनालयाची भिंत कोसळली

मुसळधार पावसामुळे भिंत पडली; 2019 मध्ये भिंतीचा काही भाग कोसळला होता

विनायक सामंत | प्रतिनिधी

डिचोली: गेले 5 दिवस राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पडझड, इमारती कोसळण्याचे प्रकार घडताहेत. राज्याच्या विविध भागांना या मुसळधार पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शुक्रवारी डिचोली तालुक्यातील पिळगाव गावात मुसळधार पावसामुळे वाचनालयाची भिंत कोसळून पडली आहे.

युवक कला मंचच्या वाचनालयाची भिंत कोसळली

पिळगाव येथील युवक कला मंचच्या वाचनालयाची एक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळली आहे. सुरुवातीला २०१९ मध्ये या वाचनालयात थोडी पडझड झाली होती. तेव्हा हे वाचनालय नजीकच्या घरात चालवलं जात होतं. तत्कालीन मुख्यमंत्री स्व.मनोहर पर्रीकर यांनी वचन दिलं होतं की या वाचनालयाची सोय चांगल्या ठिकाणी करणार. मात्र त्यांच्या निधनानंतर ते काम अपूर्ण राहिलंय.

सरकारने लक्ष घालावं

२०१९ मध्ये पडझड झाल्यावर मामलेदार, उपजिल्हाधिकारी या सर्वांना याविषयी कळवण्यात आलं होतं. आता या वाचनालयाची संपूर्ण भिंतच कोसळल्यानं खूप मोठं नुकसान झालंय, असं युवक कला मंचचे सचिव संदेश गाेवेकर यांनी सांगितलं. तरी सरकारने याबाबतीत लक्ष घालावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

हा व्हिडिओ पहाः Video | GOA| PROUD | केरीच्या आदित्यला केंद्राची स्कॉलरशीप, आयर्लंडमध्ये करतोय एमबीए

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!