‘एंजॉय’ बेतला जीवावर ; वाहून निघालेल्या युवकाला ग्रामस्थांनी वाचवले !

सावंतवाडीनजीकच्या माडखोल धरण इथली घटना !

विनायक गांवस | प्रतिनिधी

सावंतवाडी : माडखोल धरणावर जीवाची मजा करण्यासाठी गेलेला कारिवडे येथील घाडी नामक युवक वाहून गेला. पाण्याचा प्रवाहासोबत तो वाहून गेला. दैव बलवत्तर म्हणून दगडाचा सहारा घेत अडकला. दरम्यान, त्याला वाचविण्यासाठी गेलेले स्थानिक गोविंद शेटकरही पाण्याच्या प्रवाहासोबत ओढले गेले.

आज दुपारी ३ वाजण्याचा सुमारास ही घटना घडली. पाण्याचा जोर एवढा होता की बचाव कार्यात व्यत्यय येत होता. स्थानिक ग्रामस्थांनी दोरीच्या सहाय्यानं बचाव कार्यास सुरुवात केली. जीवन केसरकर, सुनील केसरकर, गोविंद शेटकर, श्री. सामंत, विनोद सावंत, शुभम सावंत, कृष्णा राऊळ, अक्षय लात्ये, आप्पा राऊळ यांनी त्या युवकाचा जीव वाचवला.

पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांची चाहूल लागताच बुडणाऱ्या त्या युवकानं घटनास्थळावरून पळ काढला. सावंतवाडी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सखाराम भोई, सुनील नाईक, भुषण भोवर आदींनी रेस्क्यु कीटसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्या आधी ग्रामस्थांचा मदतीनं त्या युवकाला सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं. माडखोल सरपंच संजय शिरसाट यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांकडून धरणावर जाणाऱ्यांना बंदी घालण्याबाबत ग्रामपंचायतनं बोर्ड लावत, रस्ता बंद करण्याचा सुचना दिल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!