ACCIDENT | अभिजात पर्रीकरांच्या वाहनाला अपघात

सुळकर्णा येथे अपघात; सुदैवाने अभिजात सुखरूप; कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपे: गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अभिजात पर्रीकर यांच्या वाहनाला सुळकर्णा येथे अपघात झाला. सुदैवाने अभिजात हे सुखरूप आहेत. अभिजात हे नेत्रावळी येथे गेले होते. तिथून ते दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान परत येताना सुळकर्णा येथे त्यांची कार रस्त्याच्या बाजूला गेली आणि वाहनावरचा ताबा सुटल्याने गाडीचा अपघात झाला. या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

हेही वाचाः राज्यातील पेट्रोलच्या दरांनी अखेर सेन्चुरी मारलीच!

रस्त्याच्या अंदाज चुकल्याने अपघात

गेले काही दिवस राज्याला पावसाने झोडपून काढलंय. उत्तर तसंच दक्षिण गोव्यात पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरू आहे. यामुळे रस्ते गुळगुळीत झालेत. दुपारी पावसाचा जोर जास्त असल्याने समोरचं काही दिसलं नाही आणि अंदाज चुकल्याने गाडी रस्त्याच्या बाहेर जाऊन अपघात झाला असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मात्र नेमकं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही.

हेही वाचाः ‘नॅशनल स्पेलिंग बी’मध्ये गोव्याच्या अथर्वने मिळवले दुसरे स्थान

केपे पोलिसांत अपघाताची नोंद

गाडीला अपघात झाला तेव्हा अभिजात गाडीत एकटेच होते, की त्यांच्यासोबत अजून कुणी होतं ही माहिती मिळू शकलेली नाही. अभिजात नेत्रावळी येथे आपल्या फार्म हाऊसवरून येताना हा अपघात झाला असल्याचं समजतंय. सुळकर्णा हा परिसर केपे पोलिस स्थानात येत असल्यानं केपे पोलिसांनी अपघात नोंद केली आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | बुधवारी कोरोना मृतांचा आकडा पुन्हा वाढला

पुढील तपास सुरू

यासंबधी केपे निरिक्षक पेडणेकर यांना विचारलं असता त्यांनी अभिजात पर्रीकरांच्या वाहनाला अपघात झाल्याचं सांगितलं. पुढील तपास सुरू आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | CM | MINING | मायनिंग सुरू करण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न : मुख्यमंत्री

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!