गोव्यातील १५ ते २९ वयोगटातील बेरोजगारीचा दर २५.८ टक्के…

केंद्रीय कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत दिली माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : देशातील बेरोजगारीचा सरासरी दर २०२०-२१ मध्ये ४.२ टक्के असताना गोव्यात मात्र तो १०.५ टक्के राहिला. या काळात गोव्यातील १५ ते २९ वयोगटातील बेरोजगारीचा दर २५.८ टक्के होता, अशी माहिती केंद्रीय कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरातून दिली आहे. 
हेही वाचा:शिक्षण क्षेत्रातील वारसा जपण्यास सावंत सरकार अपयशी…

२०२०-२१ मध्ये गोव्यातील बेरोजगारीचा सरासरी दर १०.५ टक्के

तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो यांनी हा प्रश्न विचारला होता. गतवर्षी गोव्यात बेरोजगारीचा दर किती होता असा अतारांकित प्रश्न विचारत, त्याची गटवार माहितीही खासदार फालेरो यांनी मागवली होती. त्यावर २०२०-२१ मध्ये गोव्यातील बेरोजगारीचा सरासरी दर १०.५ टक्के असल्याचे म्हटले आहे. 
हेही वाचा:250 चे तिकीट 500 ते 800 रूपये; लॉटरी तिकिटांंची ब्लॅकमध्ये विक्री…

बेरोजगारी कमी करण्यासाठी राबविल्या विविध योजना

गोव्यासह देशभरातील बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. राज्यांच्या पायाभूत विकासावर भर देऊन अधिकाधिक रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत, असे मंत्री तेली यांनी उत्तरात म्हटले आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या बेरोजगारीवरून विरोधी काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड या पक्षांनी वारंवार सत्ताधारी भाजपवर टीकास्र सोडलेले आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपचेच सरकार असतानाही बेरोजगारीवर नियंत्रण येत नसल्याचा आरोप करीत नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवरही धरले होते.
हेही वाचा:अटल सेतूवरील लाखोंचे वीज साहित्य चोरीला…

     

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!