स्कूटरच्या डिकीतून पैसे चोरणारा अखेर गजाआड

फातोर्डा पोलिसांनी रंगेहात पकडले : सात दिवसांची कोठडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: फातोर्डा पोलिसांनी स्टेडियमजवळ उभ्या असलेल्या स्कूटरच्या डिकीमधून मोबाईल फोन चोरी करताना संतोष कट्टीमनी (३२, रा. विजयपूर-कर्नाटक) याला रंगेहाथ पकडले. न्यालयात उपस्थित केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचाः कणकवलीत चोरट्यांनी एका रात्रीत फोडली सहा दुकानं

स्टेडियमजवळून गस्त घालत असताना पकडला चोर

गुप्तचर खात्याचे कर्मचारी नीलेश कासकर स्टेडियमजवळून गस्त घालत असताना त्यांना संबंधित व्यक्ती स्कूटरजवळ काही संशयास्पद हालचाली करत असल्याचं लक्षात आलं. काही कालावधीनंतर संशयिताने स्कूटरची डिकी उघडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याला पकडून ताब्यात घेण्यात आलं. या प्रकारानंतर सीमा बनसोडे (रा. कोलमोरोड नावेली) यांच्या तक्रारीवरून फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

11 सप्टेंबरला केली होती चोरी

चोरीचा हा प्रकार ११ रोजी सायंकाळी ६ ते ७.३० या कालावधीत पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या बाहेर घडला. बनसोडे या जॉगिंग करण्यासाठी ट्रॅकवर गेल्या होत्या. त्याआधी स्कूटर स्टेडियमजवळ उभी करून मोबाईल डिकीमध्ये व्यवस्थित बंद करून ठेवला होता. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. संशयिताकडून २ मोबाईल फोन, १ स्क्रूड्रायव्हर, १ एटीएम कार्ड व पॅनकार्ड, आधार कार्ड असलेले पाकीट आढळून आले.

म्हापशातील चोरीतही सहभाग

संशयित संतोष याची कसून चौकशी केली असता म्हापसा येथे ७ सप्टेंबर २०२१ रोजी स्कूटरच्या डिकीतून रोख ३२ हजार रुपये चोरीला गेले होते. ही चोरी तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियातून राज्यभर व्हायरल झाला होता. या प्रकरणात संशयित संतोष कट्टीमनी याचाच सहभाग असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. संशयित संतोष याला न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हा व्हिडिओ पहाः POLITICS | GOA FORWARD | गोवा फॉरवर्डची राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!