हडफडेत महिलेची सोनसाखळी हिसकावून चोरट्याचा पोबारा

५० हजारांची १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावली

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: हडफडे येथे दुचाकीस्वार चोरट्याने एका महिलेची ५० हजारांची १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावली. संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून हणजूण पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.

मंगळवारी १४ सप्टेंबरची घटना

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना मंगळवारी १४ रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास या हडफडे येथे पिझ्झा हटजवळ घडली. फिर्यादी रेणुका लमाणी यांनी या प्रकरणी तक्रार गुदरली आहे. संशयित डिओ स्कूटरवरून आला आणि त्याने रस्त्याने चालत जाणाऱ्या रेणुका लमाणी यांच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पळून गेला.

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

संशयिताने काळ्या रंगाचे जॅकेट, काळ्या रंगाची पँट आणि हेल्मेट घातलं होतं. चोरीस गेलेल्या सोनसाखळीची किंमत ५० हजार रुपये आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम पेडणेकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

हा व्हिडिओ पहाः POT HOLES | आंदोलनाचा इशारा देताच कामाला सुरुवात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!