‘खोला मिरची’चा तडका आता टपालद्वारे सर्वदूर!

उपमुख्यमंत्री कवळेकर यांच्या हस्ते आज प्रकाशन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: ‘खोला मिरची’च्या जागतिक स्तरावर नेण्यासाठी टपाल खात्याने कव्हरवर तडका लावणार असून या कव्हरचे प्रकाशन आज उपमुख्यमंत्री तथा कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचाः भाजपमध्ये अल्पसंख्याक मुख्यमंत्रीही शक्य

भौगोलिक मानांकन मिळालेली गोव्यातील पहिलीच मिरची

खोल परिसरातील माळरानावर पावसाळ्यात मिरचीचे पीक घेण्यात येतं. या मिरचीच्या डिसेंबर २०१९ मध्ये प्रयोगशाळेत विविध चाचण्या घेतल्यानंतर ती आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असल्याचे निष्कर्ष आले होते. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये तिला भौगोलिक मानांकन मिळालं. असं मानांकन मिळालेली ही गोव्यातील पहिलीच मिरची आहे.

मिरचीला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्याचा हेतू

या मिरचीचा प्रसार जागतिक स्तरावर करण्याच्या उद्देशाने टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांनी कव्हर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी टपाल खात्याने तिकीटावर फेणीचं चित्र प्रदर्शित केलं आहे. या मिरचीला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळावी, हाच यामागचा हेतू आहे, असं खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Siddhi Naik Case | Follow Up | Crime | पोलिसांसमोरचं आव्हान कायम, तपास अजूनही सुरु

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!