गणेशोत्सवानंतरच ठरणार रणनीती

भाजप निवडणूक प्रभारी फडणवीस २० रोजी गोव्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: सत्ताधारी भाजपची रणनीती गणेशोत्सवानंतरच ठरण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. भाजपचे निवडणूक प्रभारी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त समितीतील सदस्य जी. किशन रेड्डी आणि दर्शना जरदोश हे २० सप्टेंबर रोजी गोव्यात येणार आहेत. सुकाणू समितीसोबत बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे, असे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत.

भूपेंद्र पटेल यांचा रविवारी शपथविधी पार पडला

गुजरातचे नूतन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा रविवारी शपथविधी पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. गुजरात भेटीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवडणूक विषयावर चर्चा केली. गुजरातहून येताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

फडणवीस यांची गोवा भेटीची तारीख निश्चित

यावेळी फडणवीस यांची गोवा भेटीची तारीख निश्चित करण्यात आली. निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच गोव्यात येत आहेत. त्यांच्यासोबत गोवा निवडणुकीची जबाबदारी असलेले अन्य सदस्य दर्शना जरदोश आणि जी. किशन रेड्डी हेही असणार आहेत. निवडणुकीला चार महिन्यांचा अवधी असला तरी भाजपने प्रचार सुरू केला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे मतदारसंघांना भेटी देत आहेत. इच्छुक उमेदवार फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

हा व्हिडिओ पहाः COVID-19 | बाजारात गर्दी होऊनही रुग्णसंख्येत घट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!