कोकण रेल्वेची सेवा सुरळीत

मडगाव जंक्शन ते थिवीम या स्थानकांदरम्यान पडलेलं झाड तातडीनं केलं बाजूला

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: तौक्ते चक्रीवादळामुळं गोवा तसंच कोकण किनारपट्टीवर तुफानी वा-यासह जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळं सकाळी मडगाव जंक्शन ते थिवीम या स्थानकांदरम्यान एक झाड पडल्याची घटना घडली. ही माहिती मिळताच कोकण रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तातडीनं अडथळा दुर केला आणि रेल्वे वाहतुक सुरळीत केली. त्यामुळं थिरूवनंतपुरम ते लोकमान्य टिळक एक्सप्रेस तीन तास उशीरा धावली. त्याचबरोबर मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी फेस्टिव्हल एक्सप्रेस एक तास लेट झाली. यादरम्यान कोणतीही जिवितहानी किंवा कोणीही जखमी नाही. कोकण रेल्वेची सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या अधिकृत सुत्रांनी दिलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!