राज्य सरकारने 59 कुटुंबांना दोन लाख रुपये दिले

परिवहन मंत्री मॉविन गुदिन्होंची माहिती; टॅक्सीसाठी ‘डिजिटल मीटर’वरील बसवण्यासाठी मुदतवाढ नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्य सरकारने ‘गोवा राज्य अंतरिम नुकसान भरपाई योजने’अंतर्गत गंभीर अपघातात जीव गमावलेल्या 59 कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली असल्याची माहिती परिवहन मंत्री मॉविन गुदिन्होंनी मंगळवारी दिली. गुदिन्होंनी गोवा राज्य अंतरिम भरपाई योजनेसाठी कुटुंबांना अर्ज करण्याची मुदत एक वर्षासाठी वाढविण्यात आली असल्याचं सांगितलं.

हेही वाचाः आरोग्यमंत्र्यांनी आयव्हरमेक्टिन घोटाळ्यासाठी गोंयकारांची, काँग्रेसची माफी मागावी

दोन लाख रुपयांची भरपाई

गोवा राज्य अंतरिम नुकसान भरपाई योजनेंतर्गत एकाद्या गंभीर अपघातात सदस्य गमावलेल्या कुटुंबाला राज्य शासनाने प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई दिली आहे. गोवा राज्य अंतरिम नुकसान भरपाई योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे, गुदिन्हो म्हणाले.

हेही वाचाः नरदेव पाहिजे पण कोव्हिशिल्ड लस घेतलेलाच…

16 परिवहन सेवा सुरू

विविध सेवांसाठी कार्यालयात येणाऱ्या लोकांचं ओझं कमी करण्यासाठी गुदिन्होंनी मंगळवारी 16 परिवहन सेवा सुरू केल्या. वाहतुकीच्या परवान्यासाठी अर्ज करताना माल वाहतूक परवान्यासह अन्य 14 सेवा ‘ऑनलाईन’ देण्यात आल्या आहेत. आता लोकांना सरकारी सेवांसाठी परिवहन कार्यालयात येण्याची गरज भासणार नाही, असं गुदिन्हो म्हणाले.

हेही वाचाः राष्ट्रीय कोरोना लसीकरण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना केंद्राकडून जाहीर

अजून मुदतवाढ नाही

टॅक्सीच्या डिजिटल मीटरवर बोलताना गुदिन्हो म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशांनुसार टॅक्सी चालकांना कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असं गुदिन्हो म्हणाले. टॅक्सीना डिजिटल मीटर बसविण्यासाठी आधीच तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. डिजिटल मीटर बसविण्याला नकार देणं किंवा मीटरने शुल्क न आकारल्यास टॅक्सी परवाने रद्द होऊ शकतात, असं गुदिन्हो म्हणाले.

हेही वाचाः राज्यात लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर पर्यटन पुन्हा सुरू करावं

टॅक्सी चालक ‘पर्यटन उद्योगाचे वास्तविक राजदूत’

गोव्याच्या टॅक्सी चालकांचं ‘पर्यटन उद्योगाचे वास्तविक राजदूत’ असं वर्णन करताना गुदिन्हो म्हणाले, हायकोर्टाच्या निर्देशानुसार मीटर बसवणे अनिवार्य आहे. नवीन मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीसंबंधीची फाईल मंजूर केली असल्याची माहिती यावेळी गुदिन्होंनी दिली. मी आधीच फाईली मंजूर केली आहे. उद्या मंत्रीमंडळ बैठकीत त्यावर चर्चा होईल. मी किमान दंड लागू करून फाईल वर पाठवली आहे. नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यास आम्ही थांबू शकत नाही. अन्यथा आम्हाला केंद्र सरकारला जाब द्यावा लागेल, असं गुदिन्होंनी सांगितलं.

हेही वाचाः समाजमाध्यमावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या ‘त्या’ संशयिताला अटक

मोटार वाहन कायद्यांतर्गत नवीन बदल लागू करण्याचा निर्णय

गोवा सरकारने मोटार वाहन कायद्यांतर्गत नवीन बदल लागू करण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये वाहतुकीच्या गुन्ह्यांसाठी अधिक दंड आकारण्यात येत होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!