पर्यटन उद्योग ढासळण्यामागे राज्य सरकार जबाबदार…

मनोज परब : पर्यटन स्थळांवर अनेक गैरप्रकार सर्रासपणे चालू

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्य सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे राज्यात दिवसेंदिवस पर्यटन उद्योग बिघडत चालला आहे. गोव्यातील भाजप सरकारने आतापर्यंत शेती व्यवसाय, खनिज व्यवसाय उद्ध्वस्त केला आहेच, पण आता राज्यातील पर्यटन उद्योग सुद्धा खराब होण्याच्या वाटेवर आहे, असा आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
हेही वाचाःनव्या समितीवर काँग्रेस नेत्यांकडूनच प्रश्नचिन्ह!

सरकार गैरप्रकार थांबविण्यासाठी असफल

परब पुढे म्हणाले, सध्या राज्यातील पर्यटन स्थळांवर अनेक गैरप्रकार सर्रासपणे चालू असतात. ड्रग्स, दारू, देहविक्री अशाप्रकारचे गैरप्रकार उघडपणे सुरूच आहेत आणि यामुळेच राज्याच्या बदनामीबरोबरच अर्थव्यवस्था सुद्धा ढासळते आहे. सरकार पर्यटन उद्योगात घडणारे हे गैरप्रकार थांबविण्यासाठी असफल ठरले आहे.
हेही वाचाः‘लाला की बस्ती’ मधील सात भाडेकरूंना अटक…

सरकारच्या मंत्र्यांना आपल्या खात्याची माहिती का नाही ?

पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्या मते राज्यात पर्यटन उद्योग सांभाळण्या- साठी पोलीस यंत्रणा कमी पडते, पण यंत्रणा का कमी पडते हे पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी सरळ ‘मुख्य- मंत्र्यांना विचारा,’ असे उत्तर दिले. म्हणजे भाजप सरकारच्या मंत्र्यांना आपल्या खात्याची माहिती का नाही, असा प्रश्न परब यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचाःमोरजी येथे हॉटेल कर्मचाऱ्याचा समुद्रात बुडून मृत्यू…

देसाईंनी राज्यातील पर्यटनाची वाट लावली

पुढे परब म्हणाले की, पर्यटन मंत्री खवंटे सरळ पोलीस यंत्रणेवर आरोप करतात, पण इतकी वर्षे निखिल देसाई जे पर्यटन खात्याचे संचालक म्हणून कार्यरत आहेत, त्यांना दोष देत नाही. देसाई यांनी राज्यातील पर्यटनाची वाट लावली आहे. त्यांना पदावरून त्वरित हटवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचाःन्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; संगीत पार्ट्यांचा धिंगाणा सुरूच!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!