‘जय श्री गणेशा’ गीत सर्वधर्म समभावाचं एक अनोखं उदाहरण

बोलमॅक्स परेराः मुख्य निवडणूक अधिकारी आयएएस कुणाल आणि फादर बोल्माक्स परेरा यांच्या उपस्थितीत व्हिडिओ डान्स गाण्याचं लोकार्पण

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः बहुप्रतिक्षित हिंदीत गणेश भक्ती गीत, ‘जय श्री गणेशा’ मुख्य निवडणूक अधिकारी आयएएस कुणाल आणि फादर बोल्माक्स परेरा यांच्या उपस्थितीत सांतिनेज येथील श्री सिद्धिविनायक आपटेश्वर गणपती मंदिरात झालं. यावेळी कुणाल यांनी श्रीगणेशावर व्हिडिओ गाणं तयार करण्यात सहभागी कलाकारांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं. हे गाणं भक्तिपूर्ण उच्च दर्जाचं बनलं आहे, असं कुणाल म्हणाले.

हेही वाचाः दोन घरं फोडून चार लाखांचा ऐवज लंपास

हे गाणं सर्वधर्म समभावाचं एक अनोखं उदाहरण

फादर बोलमॅक्स परेरा म्हणाले, गोव्यातील लोक धर्माबद्दल खूप सहनशील आहेत आणि अनेकदा एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होतात. हे गाणं सर्वधर्म समभावाचं एक अनोखं उदाहरण आहे, असं त्यांनी सांगितलं. कलाकारांच्या सांघिक कार्याची प्रशंसा त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले, आम्ही सर्व एक आहोत आणि आमचा बंधुभाव आम्हाला सर्वोच्च पातळीवर पोहोचण्यास मदत करेल. हे गाणं कानांना तृप्त करणारं आहे, असं ते म्हणाले.

सर्व कलाकारांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार

व्हिडीओमध्ये सहभागी असलेल्या सर्व कलाकारांचा यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. प्रख्यात संगीतकार जो डिकॉस्टा यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. गाणं जॉन आगियार यांनी लिहिलं आहे, तर अक्षय नाईक यांचा आवाज या गीताला लाभला आहे. निर्भय भव नृत्य अकादमी आणि जगदंब ढोल ताशे पथक गोवा यांचं नृत्य प्रदर्शन आहे. छायाचित्रकार/संपादक पिंटू मातापती आणि त्यांना आय क्लिकवरचं सहाय्य लाभलंय. मोर्जी पेडणेहून उमाकांत पोके यांनी गणेशमूर्ती दिली आहे.

हेही वाचाः पत्नीवर सुरा हल्ला; संशयित पतीविरुद्ध गुन्हा

गीतकार जॉन आगियार त्यांच्या स्वागतपर भाषणात म्हणाले, गणेश चतुर्थी साजरी करण्यासाठी सज्ज झालेल्यांनी त्यांच्या प्लेलीस्टमध्ये हे गाणं जोडावं. संगीत दिग्दर्शक जो डिकॉस्टा यांनी त्यांच्या गणेश गीतामागची कथा सांगितली. वर्षा मलिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हा व्हिडिओ पहाः POLITICS | कृष्णा उर्फ दाजी साळकर यांचा हल्लाबोल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!