सावंत सरकार गोव्याच्या भविष्याशी खेळतंय

'आप'च्या राहुल म्हांबरेंची टीका; दुर्गम भागातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आज शाळा सुरू झाल्या, परंतु गेल्या वर्षी ज्या समस्या उद्भवल्या त्याच समस्या यावेळीही असूनही भाजपा सरकारने गेल्या एका वर्षात या समस्या सुधारण्यासाठी काहीच केलं नाही, अशी तीव्र टीका ‘आप’चे संयोजक राहुल म्हांबरेंनी केलीये. गोव्यातील सत्तरी आणि इतर दुर्गम ठिकाणी कनेक्टिव्हिटीची समस्या कायम आहे आणि त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन वर्गात भाग घेऊ शकत नाहीत, याकडे म्हांबरेंनी लक्ष वेधलं.

हेही वाचाः वेलडन इंडिया ! एका दिवसांत 78 लाखांहून अधिक विक्रमी लसीकरण

एक वर्षं उलटूनही सरकारने काहीच केलं नाही

ही समस्या गेल्या वर्षीही होती आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुर्गम भागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी स्थापित करण्याचं आश्वासन दिलं होतं, जेणेकरुन विद्यार्थी ऑनलाईन वर्गात सहभागी होऊ शकतील. पण एक वर्षं उलटूनही त्यांनी यासाठी काहीच केलं नाही आणि अशीच समस्या अजूनही आहे, यावर म्हांबरेंनी शोक व्यक्त केला.

हेही वाचाः उत्तर गोव्यातील भाजप, काँग्रेस कार्यकर्ते ‘आप’मध्ये सामील

भाजप सरकार तरुण पिढीच्या गरजा पूर्ण करण्यात अपयशी

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी वर्गात कशी हजेरी लावायची आणि त्यांच्यासाठी सरकार काय करतंय, असा सवाल म्हांबरेंनी उपस्थित केलाय. या दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटी त्वरित सुधारली पाहिजे, जेणेकरुन मुलं त्यांच्या वर्गात सहभागी होऊ शकतील, अशी मागणीही म्हांबरेंनी केलीये. शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे आणि मुलांना वर्गात सहभाग मिळायला हवा, असं म्हणताना भाजपा सरकार तरुण पिढीच्या गरजा पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलंय, असा टोला म्हांबरेंनी लगावलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!