सावंत सरकारात कोरोना काळातही विकासाला गती

आमदार दयानंद सोपटेंचं प्रतिपादन; आगरवाड्यात मान्सूनपूर्व कामांना शुभारंभ

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः कोरोना महामारीच्या काळातही आर्थिक स्थितीवर मात करत भाजपचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती मिळत आहे. एका बाजूने कोरोनाची लाट तर दुसऱ्या बाजूने विकास. कोरोना काळातही विकासात कुठेच खंड पडला नाही. विकासासाठी योग्य ते सहकार्य सरकारकडून मिळत आहे. आता जनतेने आपल्याला हवा तसा विकास करून घ्यावा, असे आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटेंनी केलं. गुरुवारी आगरवाडा येथे आमदार सोपटेंनी मान्सूनपूर्व कामांचा शुभारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचाः स्थानिकांना नको असल्यास प्रकल्प आणू देणार नाही

सरपंच, पंच सदस्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आगरवाडा गावच्या सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर, पंच नितीन चोपडेकर, पंच भगीरथ शेट्ये, पंच नीलम मसुरकर उर्फ शेट्ये, माजी सरपंच बाबली उर्फ बाबा राऊत आदी नागरिक उपस्थित होते. पावसाळा ऐन तोंडावर आला असून आगरवाडा पंचायत क्षेत्रातील ओहळ, नाले, गटारे यांची स्वच्छता करण्याच्या कामावर एकूण 4 लाख 84 हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत. पावसाचं रस्त्यावरील पाणी सुरळीत गटार नाल्यातून जावं यासाठी कामाची सुरुवात करण्यात आली.

हेही वाचाः शिक्षक पात्रता परिक्षा प्रमाणपत्राचा कालावधी सात वर्षांहून वाढवून आजीवन

भाजप सरकारच करू शकतं गावागावाचा विकास

भाजप सरकारच योग्य पद्धतीने नियोजनबद्ध विकास करू शकतं. विरोधी पक्षांकडे कोणतेच ठोस कार्यक्रम नसल्यानं ते सरकारवर केवळ विरोधक म्हणून टीका करतात. त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करून आपापल्या परिसराचा विकास करावा, आपल्या परिसरातील गटारे, ओहाळ, नाले स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं आवाहन सोपटेंनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!