अपघातामुळे दुचाकी चोरटा गजाआड

अपघात तसंच व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे सापडला चोर

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः एका अपघातामुळे आणि व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे पेडणे पोलिसांनी एका दुचाकी चोरट्यास अटक करून गजाआड केलं. हरमल येथे शुक्रवारी दुचाकी वाहनाने हरमल बेकरीजवळ एका पादचारी विदेशी महिलेस धडक दिली. अपघात होताच घटनास्थळावर दुचाकी सोडून तो पळाला. त्यासंदर्भात शिबू माणिक (पश्चिम बंगाल) या युवकाला आज अटक केली.

हेही वाचाः ‘आप’कडून जीएमसीत अन्न वितरण मोहीम सुरूच

व्हिडिओमुळे सापडला चोर

अपघातावेळी काही स्थानिक व्यक्तींनी दुचाकीस्वाराचा व्हिडिओ शूट केला होता. संशयिताच्या शरीरावरदेखील जखम झाली होती आणि हा व्हिडिओ पेडणे पोलिसांनी पाहिला. या चोरीप्रकरणी पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताला पकडण्यासाठी पथक तयार केलं. यासंदर्भात आरोग्य केंद्रात लक्ष ठेवण्यात आलं होतं.

हेही वाचाः पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून मोदी सरकारने लुटले २२ लाख ७० हजार कोटी

शुक्रवारी म्हापशातील जिल्हा हॉस्पिटलात चोराला अटक

११ जून रोजी संशयित व्यक्ती जिल्हा रूग्णालय म्हापसा येथे तपासणीसाठी गेला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आवश्यक उपचार केले. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आणखी चोरीला गेलेल्या दुचाक्या सापडण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः पेडण्यातील शेतकऱ्यांना प्रवीण आर्लेकरकडून मदतीचा हात

पेडणे पोलिसांची कारवाई

पेडणे पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, रूपेश कोरगावकर, फटी नाईक, महेश नाईक, जीवन गोवेकर यांनी ही पेडण्यात कारवाई केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!